दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या; शिवसेनेचे निवेदन

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मंगळवेढा : राज्यातील इतर तालुक्‍यांच्या दुष्काळाच्या तुलनेत मंगळवेढा तालुक्यात अतिशय भयावह आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळी उपाययोजना करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेनानेत्या शैला गोडसे यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे आंधळगाव येथे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रीय दुष्काळी पथकाचे प्रमुख सुभाषचंद्र मिना, सदस्य एम.जी.टेंभूर्णे, विजय ठाकरे यांचेसह विभागीय आयुक्त दिपक म्हैसकर, राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा आधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, प्रांत अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार आप्पासाहेब समिंदर, प.स. सभापती प्रदिप खांडेकर, शिवाजीराव काळुंगे, शिवाजीराव नागणे, शैलाताई गोडसे,तालुकाप्रमुख येताळा भगत,तुकाराम कुदळे,नारायण गोवे यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. या निवेदनात त्यांनी  म्हटले आहे, की यांनी शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन झाले.

तरी यासाठी आवश्यक असणारी पाणीपट्टी दुष्काळ निवारण निधीमधून जमा करण्याच्या मागणीबरोबर या भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफी, जनावरांच्या दावणीलाच चारा उपलब्ध करून देणे, फळबागा जगविण्यासाठी टँकरसाठी अनुदानाची तरतूद करणे,शेतकऱ्यांचे विज बिल व कर्ज सरसगट माफ करणे, दुष्काळाची तीव्रता कमी होईपर्यंत वीजपुरवठा खंडित न करणे, रोजगार हमीची कामे सुरू करणे, शेततळे व विहिरीसाठी त्वरित अनुदान उपलब्ध करून देणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Give justice to drought affected farmers Shivsenas Letter