....तर सरकारचे "हर हर महादेव' - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 सप्टेंबर 2016

कोल्हापूर - सत्तेचे तख्त पालटू शकेल इतकी ताकद मराठा समाजाच्या मोर्चात आहे. राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली नाही, तर सरकारचे "हर हर महादेव‘ व्हायला वेळ होणार नाही अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार नारायण राणे यांनी आज सरकारवर शरसंधान केले. "शिवाजी द ग्रेट‘ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. पत्रकारानी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यात मोठ्या संख्येने मराठ्यांचे मोर्चे निघत आहेत एखाद्या मोर्चात आपणही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

कोल्हापूर - सत्तेचे तख्त पालटू शकेल इतकी ताकद मराठा समाजाच्या मोर्चात आहे. राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली नाही, तर सरकारचे "हर हर महादेव‘ व्हायला वेळ होणार नाही अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार नारायण राणे यांनी आज सरकारवर शरसंधान केले. "शिवाजी द ग्रेट‘ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. पत्रकारानी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यात मोठ्या संख्येने मराठ्यांचे मोर्चे निघत आहेत एखाद्या मोर्चात आपणही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

राणे म्हणाले, ‘तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने अठरा लाख लोकांचा सर्व्हे केला. मराठ्यांना सोळा टक्‍क्‍यांपर्यंत आरक्षण द्यावे, असा अहवाल दिला. तमिळनाडूच्या धर्तीवर 52 टक्‍क्‍यांवर आरक्षणाची टक्केवारी असावी, असेही मत मांडले होते. मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती हलाखीची आहे त्यामुळे आरक्षण क्रमप्राप्त आहे असेही स्पष्ट होते. राज्य शासनाने या अहवालाचा आधार न घेता केंद्रीय मागासवर्गीय अहवाल आणि मंडल आयोगाची दखल घेत म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही अहवाल असे आहेत, की ज्यांचा सर्व्हे झालेला नाही. सरकारमध्ये धमक असेल तर न्यायालयात आजही आमचा अहवाल मांडावा. राज्यातील मराठ्यांची संख्या 34 टक्के इतकी आहे. ठिकठिकाणी निघणारे लाखोंची संख्या पाहता तख्त पालटू शकेल इतकी ताकद मराठा समाजात आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर जाताना "हर हर महादेव‘ असा नारा देत होते. राज्य सरकारने मोर्चाची दखल घेतली नाही तर त्यांचे "हर हर महादेव‘ व्हायला वेळ लागणार नाही.‘‘ 
 

मराठा आरक्षणाबाबत बाजू मांडण्यासाठी सरकारने हरिष साळवे नावाचा वकील दिला आहे. काय आहे या वकिलांची फी? साळवे, शुक्‍ला. तिरोडकर अथवा सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करणारे विनोद पाटील यांच्या मागे कोण आहे हे जनतेने ओळखावे. एकीकडे आरक्षण देतो असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विचारांची माणसे कायदेशीर प्रक्रियेत घुसवायची असे दुटप्पी धोरण सरकारचे आहे, असा आरोप राणे यांनी केला. 

मुख्यमंत्री गेल्या दोन वर्षापासून शाश्‍वत विकास करणार असे सांगतात. कसला विकास आणि कसला काय, असा टोलाही राणे यांनी लगावला. 

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेटीगाठीचे सत्र सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांशी असलेले मतभेद आणि मराठा मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर ओबीसींचे संघटन करण्याचा हा प्रयत्न आहे का? या प्रश्‍नावर राणे म्हणाले,"" अनुसूचित जाती अथवा ओबीसी यापैकी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी आमची मागणी आहे. 
 

रुग्णालयात एखाद्यास पाहायला जाणे यात गैर काही नाही. वेळप्रसंगी मीही भुजबळांच्या भेटीसाठी जाईन. यामागे काही राजकारण असेल तर ते मला माहीत नाही. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे, असेही राणे यांनी सांगितले.‘‘ 

‘मराठा समाजात जन्म झाल्याचा आपल्याला निश्‍चितच अभिमान आहे. लाखोंच्या संख्येने निघणारे हे मोर्चे पाहता भावी पिढ्यांसाठी ही एकजूट निश्‍चितपणे आशादायी असेल.‘‘ 
- नारायण राणे, कॉंग्रेसचे नेते 

Web Title: Give reservation to Maratha community, says Narayan Rane