मुस्लिमांना आरक्षण द्या अन्यथा जनआंदोलन उभारू: अल्पसंख्यांक हक्क संघर्ष समिती

प्रमोद बोडके
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मॉब लीन्चींगमध्ये सहभागी झालेल्या दोषींना कडक शिक्षा देण्याकरिता व मॉब लीन्चींगच्या हल्ल्यात जीव घेणाऱ्या प्रवृत्तींना फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करावी. या हल्ल्यात पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

सोलापूर : मुस्लीम समाजालाही पाच टक्के आरक्षण देऊन मेगा भरतीत जागा राखून ठेवण्याची मागणी आज अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीने केली आहे. मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मागासवर्गीय आयोगाच्या शिफारस घेऊन मुस्लीम समाजालाही पाच टक्के आरक्षण द्यावे अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

हाजी म. युसूफ शेख (मेजर), माजी नगरसेविका नसीमा शेख, तब्बसुम शेख, सलीम मुल्ला, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य हाजी अजीज पटेल, परिवहन समितीचे माजी सदस्य हाजी महिबूब हिरापुरे, म. हनीफ सातखेड, हाजी सलीम पटेल, अनिल वासम, लिंगव्वा सोलापुरे, दाऊद शेख, अकबर लालाकोट, चांद लालकोट, शब्बीर शेख, करीम नालवार यांच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी देऊन ते सक्षम करावे. शासनाच्या मेगाभरतीत मुस्लीमाकारिता जागा राखून ठेवाव्यात, देशात सध्या वाढत चाललेले मॉब लीन्चींगचा प्रकार त्वरित थांबविण्याकरिता कडक परिणामकारक उपाययोजना करावी. मॉब लीन्चींगमध्ये सहभागी झालेल्या दोषींना कडक शिक्षा देण्याकरिता व मॉब लीन्चींगच्या हल्ल्यात जीव घेणाऱ्या प्रवृत्तींना फाशीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करावी. या हल्ल्यात पीडित कुटुंबाला संरक्षण व आर्थिक मदत देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 

पाच लाख सह्यांचे निवेदन -
मुस्लिम आरक्षणाचा पुढील टप्पा म्हणून सोलापुरात पाच लाख सह्यांचे निवेदन करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच सह्यांची मोहीम सोलापुरात राबविणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीचे निमंत्रक हाजी युसूफ म. हनीफ शेख (मेजर) यांनी केली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Give Reservation to Muslims otherwise create mass agitation says Minority Rights Conflict Committee