शास्त्री उद्यानात पक्षी शुश्रूषा केंद्राचे उद्‌घाटन करताना आयुक्त रवींद्र खेबुडकर, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण. शेजारी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, नम्रता चव्हाण, अजित काशीद, नगरसेवक राजेश नाईक, शिवराज बोळाज आदी.
शास्त्री उद्यानात पक्षी शुश्रूषा केंद्राचे उद्‌घाटन करताना आयुक्त रवींद्र खेबुडकर, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण. शेजारी उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, नम्रता चव्हाण, अजित काशीद, नगरसेवक राजेश नाईक, शिवराज बोळाज आदी.

पक्षी-प्राण्यांच्या सहअस्तित्व मानुया... त्यांच्या सोबत जगुया !

सांगली - 'प्रत्येकाला आपल्या जगणयाचं पडलं असताना पक्षाच्या निवाऱ्याचं काय घेऊन बसलात राव..! अशा भोवतालात आज जाणत्या सांगलीकरांनी आजची सकाळ पक्षांच्या भवितव्यासाठी खर्च केली.

आपल्या सभोवताली गुंजण करणाऱ्या पक्षांनाही आपल्याइतकाच जगण्याचा हक्क आहे. त्यांचं सहअस्तित्व मान्य करुन नव्या पिढीपर्यंत तो संदेश द्यायचा आजचा दिवस होता. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने शहरातील विविध स्वयंसेवी संस्था संघटनांनी एकत्र येत हा निर्धार केला. यानिमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावरून पक्षी दिंडी काढतानाच येथील शास्त्री चौकात दक्षिण महाराष्ट्रातील पहिले पक्षी शुश्रूषा केंद्राचीही सुरवात झाली. पक्षांचा हक्काचा निवारा असलेली शहरातील वनसंपदा टिकवतानाच उद्यानांच्या शुभोभिकरणाचा संकल्प झाला. चला पक्षी वाचवुया... या सकाळ माध्यम समुहाच्या आवाहनाला प्रतिसाद देत निसर्गातील सहअस्तित्वाच्या मुळ मंत्राचा जागर झाला.

सांगली,मिरज कुपवाड शहर महापालिका, सांगली वन विभाग, इंडियन मेडीकल असोशिएशन, ऍनिमल सहारा फाउंडेशन, खोपा बर्ड हाउस, ऍनिमल राहत, इन्साफ फाउंडेशन, बर्ड सॉग्स्‌, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप, वेलनेस, रॉयल्स यूथ स्टुडंट फाउंडेशन यांच्यासह विविध संस्थांनी गेले महिनाभर या मोहिमेसाठी शहरात मोठी जागृती मोहिम राबवली होती. विविध राजकीय संघटना, लोकप्रतिनिधी,नगरसेवक, विविध शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फृर्त प्रतिसाद दिला. शहराचे प्रथम नागरिक महापौर हारुण शिकलगार, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपमहापौर विजय घाडगे,नगरसेवक शेखर माने, उपायुक्त सुनील पवार, विभागीय वनाधिकारी समाधान चव्हाण,वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर, इंडियन मेडिकल असोशिएशनचे डॉ.अनिल मडके, सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत येथील राम मंदिर चौकातून फेरीला प्रारंभ झाला. पंचमुखी मारुती रस्ता, स्टॅन्ड रस्ता मार्गे फेरीचा लालबहादूर शास्त्री उद्यानात सांगता झाली. तेथे झालेल्या कार्यक्रमात या शहरातील पक्षी वैभव जतन करण्यासाठीच्या विविध उपक्रमांची सुरवात झाली. एका भविष्यवेधी उपक्रमाची ही सुरवात ठरली.

मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील पाच उद्यानात लावण्यात येणाऱ्या कृत्रिम घरट्यांचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर जखमी घारीला उपचारानंतर निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी प्रास्ताविक केले. "यिन'ची सदस्या पौर्णिमा उपळावीकर हिने सूत्रसंचालन केले. तर ऍनिमल सहाराच्या पुष्पा काशीद यांनी आभार मानले.

'पक्षांचे अस्तित्व आपल्या अस्तित्वाचाच भाग आहे. शहरातील उद्यानांचे शुशोभिकरण करण्यात येईल. इथे सुरु झालेल्या पक्षी शुश्रूषा केंद्रासाठी महापालिका सर्वोतपरी ती मदत देईल.''
- रवींद्र खेबुडकर, आयुक्त रवींद्र खेबुडकर

'आपल्या सभोवताली आजही पक्षी आहेत मात्र गोंगाटात त्यांचे अस्तित्वच जाणवणे बंद झाले आहे. त्यांचे आवाज लक्ष देऊन ऐका. तुमच्या जगण्याची समृध्दी वाढेल. त्यांच्या अस्तित्वाची चिंता ही सर्वांनाच असायला हवी.''
- डॉ.अनिल मडके, अध्यक्ष, इंडियन मेडीकल असोशिएशन,सांगली

'बऱ्याचदा पक्षी प्राणी जखमी अवस्थेत सापडला तरी फोन येतात. मगर दिसली तर ती पकडून न्या म्हणून सांगितले जाते. आपले अस्तित्व सर्व पक्षी-प्राण्यांच्या अस्तित्वासोबत जोडले आहे. त्यांसाठीची जाणिव जागृती अशा उपक्रमांमधून अपेक्षित आहे. भविष्यात ही जाणिव शाळा-महाविद्यालयांसह सर्व स्तरावर निर्माण करण्यासाठी आपण सारे एकत्रितपणे काम करुयात.''
- समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी

'महापालिकेची सर्वच उद्याने विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शहरातील वनसंपदा टिकवणे आणि त्यात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्वानी एकत्रित परिणाम करुया. इथळे पक्षी शुश्रूषा केंद्र भविष्यात प्राणी शुश्रूषा केंद्र म्हणूनही लौकीक मिळवेल.''
- विजय घाडगे, उपमहापौर

'शहरातील विविध सेवाभावी प्रामीमित्र संघटना गेली अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने काम करीत आल्या आहेत. त्यांच्या मागे बळ उभे करण्यासाठी महापालिका-वनविभागासह विविध शासकीय यंत्रणा उभ्या ठाकल्या आहेत. ही मोठ्या कामाची सुरवात आहे.''
- शेखर माने, अध्यक्ष रॉयल युथ क्‍लब

'गेल्या पाच सहा वर्षापासून सर्वच संघटना एकत्रितपणे काम करीत आहेत. यापुढच्या काळात जखमी पक्षांवर उपचार करणे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी नेमके काय केला पाहिजे याबद्दल व्यापक जागृती मोहिम सुरु करु.'"
- शरद आपटे, पक्षी अभ्यासक

'तुकड्या तुकड्यात काम करणाऱ्या सर्व प्राणीमित्र संघटनांना एकत्र आणण्याचे काम सकाळने केले. यापुढच्या काळात हे काम अधिक जोमाने करण्याचा उत्साह मिळाला आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंतच हा संदेश पोहचवला पाहिजे. ''
- प्रा.शशिकांत ऐनापुरे, डॉल्फिन नेचर ग्रुप

नगरसेवकचाही सक्रीय सहभाग
राजेश नाईक, संतोष पाटील, स्वरदा केळकर, बाळासाहेब गोंधळे, शिवराज बोळाज, संजय पाटील, हेमंत खंडागळे, शिवाजी खोत यांचा सक्रीय सहभाग होता. तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजीराव दुधाळ यांची टीम सहभागी झाली होती.

सहभागी संस्थांचे प्रतिनिधी
ऍनिमल सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष अजित काशीद, पुष्पा काशीद, अनुष्का काशीद, इम्तीयाज शेख, गोविंद सरदेसाई, सर्वधमन कुलकर्णी, प्रताप लेंगे, शंकर माळी, विक्रांत बाबर, अमोल काशीद, प्रदीप मिरजकर, मोनिका करंदीकर, सुरेश पवार, दत्तात्रय सुतार, महेश सुतार, अमित पाटील, खोपा बर्ड हाउसचे सचिन शिंगारे, सुनीता शिंगारे, सम्राट शिंगारे, सुरज केसेकर, विश्‍वनाथ राणभरे, ऍनिमल राहतचे डॉ. नरेशचंद्र उप्रेती, अधिकारी शशिकर भारद्वाज, किरण नाईक, किरण कंठे, दिलीप शिंगाणा, कौस्तुभ पोळ, प्रसाद सूर्यवंशी, इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर, बर्ड सॉग्स्‌चे संजय पोंक्षे, शरद आपटे, डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपचे संस्थापक प्रा. शशिकांत ऐनापुरे, किरणकुमार मगदूम, मिलिंद सूर्यवंशी, अरुण कांबळे, दिनेश पाटील, रॉयल्स यूथ स्टुडंट फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील, "वेलनेस'चे सम्राट माने आदी उपस्थित होते.

चिमुकल्यांकडून प्रबोधन-
पक्षी वाचवा मोहिमेत महापालिका क्षेत्रातील मनपा शाळा नं. 1, शाळा नं. 19, न्यू हायस्कुल, लठ्ठे शिक्षण संस्थेचे सांगली हायस्कुलचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी हातात वेगवेगळे प्रबोधनपर संदेश देणारे फलक घेतले होते. "पक्षांना पिण्यासाठी घराबाहेर पाण्याचे भांडे ठेवा', "प्राणी हक्कावर नेहमी आवाज उठवा', "झाडे लावा..पर्यावरणाचे रक्षण करा', "रस्त्यावरील प्राण्यांना दगड मारू नका', "दिवाळीत फटाके फोडू नका, प्राणी भयभीत होतात', "जखमी प्राण्यांना तत्काळ दवाखान्यात न्या' अशा फलकातून चिमुकल्यांनी सांगलीकरांना संदेश दिला.

वन विभागाचे दल
वन विभागाचे विविद दले दिंडीत सक्रीय सहभागी झाले होते. वनक्षेत्रपाल अनिल निंबाळकर यांनी हरित सेनेचा संदेश देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नम्रता चव्हाण, फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय शेटे, वनपाल मिलींद वाघमारे, प्रकाश चव्हाण, एकनाथ पारथी, वनरक्षक राजेंद्र पाटील, दत्तात्रय भोसले, सचिन पाटगावकर, फायिका पठाण, चंद्रकांत ढवळे, राजश्री पाटील, अश्‍विनी राजगोंड, वनमजुर बाळकृष्ण पाटील, बाबू खामकर, सुनील कणसे, विठ्ठल पाटील, नागेश रुपनर, विलास शिंदे उपस्थित होते.

मुकबधीर प्रशिक्षकांचा बोलका सहभाग-
माधवनगर येथील मुकबधीर क्रीडा प्रशिक्षक राजू माळी व संजू माळी यांनी उत्स्फूर्तपणे दिंडीमध्ये सहभाग दर्शवला. "सकाळ' च्या कार्यालयापासून दिंडीची सुरवात होण्यापूर्वीच शाळकरी मुलांना रांगेत उभे करून शिस्त लावली. दिंडीच्या मार्गावर त्यांनी वाहतुकीचा अडथळा होऊ नये म्हणून नियंत्रण ठेवले.

जीवरक्षक अन्‌ हेल्पलाइन-
आपत्तीकाळात नागरिक, पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीला धावणाऱ्या जीवरक्षक आणि हेल्पलाईन टीम ने "सकाळ' च्या उपक्रमात नेहमीप्रमाणे सहभाग नोंदवला. जीवरक्षक टीमचे प्रमुख महंमद तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कुरणे, संतोष पांढरे हे कार्यकर्ते दोन दुचाकीवर प्रथमोपचार पेटी घेऊन दिंडीच्या मागे तत्पर होते. तर हेल्पलाइनचे प्रमुख अमोल पाटील, अविनाश पवार, अक्षय शितोळे, वैभव पवार, स्वप्निल कांबळे, शुभम शितोळे, चिंतामणी पवार, गणेश आनंदे, राहूल शितोळे सहभागी झाले होते.

सक्रीय सहभाग-
सांगली जिल्हा सुधार समितीचे ऍड. अमित शिंदे, आर्किटेक्‍ट रवींद्र चव्हाण, सांगली व मिरज वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विकास सूर्यवंशी, नंदकुमार पोवाडे, मारूती नवलाई, प्रताप दुधारे, चतुरंग ऍडव्हर्टायझिंगचे महेश कराडकर, प्रशांत कुलकर्णी, "नुपूर ऍड' चे प्रमोद गोसावी, उमेश देसाई, राष्ट्रीय सायकलपटू दत्ता पाटील, महापालिका कन्नड शाळा नं. 19 चे शिक्षक मारूती दासनट्टी, विठ्ठल माविनमर, चनविरप्पा बिरादार, सांगली हायस्कुलच्या शिक्षिका प्रेमलाताई साळी, एस. डी. बिरनाळे, महापालिका शाळा नं. 1 च्या शिक्षिका सौ. वावरे, सौ. वडगे, सौ. चव्हाण, स्प्रींगडेल इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या नुसरत इनामदार, केडब्ल्यूसी कॉलेजचे एनएसएस चे प्रा. पी. बी. पाटील, मालु हायस्कुलची हरित सेना संघटना प्रमुख नवनाथ लाड, मथुबाई गरवारे कॉलेजचे प्राचार्य आर.जी. कुलकर्णी, बालकामगार शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी त्रिमुखे, युवा मोर्चाचे कौस्तुभ कुलकर्णी, मुस्लिम ओबीसी संघटनेचे लालू मेस्त्री, सामाजिक कर्यकर्ते शिवाजीराव ओऊळकर, आभाळमायाचे प्रा. नारायण उंटवाले उपस्थित होते.

'यिन' चा सहभाग-
पौर्णिमा उपळावीकर, तेजस्विनी पाटील, सोफीया शेख, स्नेहल कांबळे, प्रियांका पवार, दीपाली सुतार, रूपाली सुतार, सुलक्षणा झेंडे, स्नेहल साळुंखे, सुप्रिया देसाई, अनुजा कांबळे, ज्योती यशवंत, पूजा यमगर, मयुरी पाटील, निकिता शिंदे, माधुरी डोंगरे, सुकन्या जोशी, पांडुरंग गयाळे, प्रशांत जाधव, इंद्रजित मोळे, सुनिल जावीर आणि यिन समन्वयक विवेक पवार यांचा सहभाग होता.

वारकऱ्यांचाही सहभाग
दिंडीत हरिपूर विठ्ठल सांप्रदायिक विठ्ठल भजनी मंडळही सहभागी झाले आहे. विठ्ठल नामाचा गजर करत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी दिला. यावेळी राजाभाऊ आळवेकर, नारायण फाकडे, गोपाळ पाचुंदे, रवींद्र आळवेकर, अर्जून खोकडे, बाळू चव्हाण, बाळासाहेब हणबर, ज्ञानदेव चंद, सर्जेराव कोळी, सचिन यादव, पांडूरंग आळवेकर, गजानन पाचुंदे, समाधान खाडे, दत्ता घोरपडे यांचा सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com