ईदच्या पार्श्‍वभूमीवर बकरी खाताहेत भाव

तात्या लांडगे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते. यासाठी बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी सोलापुरातील बकरी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या तीन दिवस आधी बकऱ्यांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. किमान 10 हजार ते कमाल दीड लाखांपर्यंत एका बकऱ्याची किंमत आहे.

सोलापूर: मुस्लिम धर्मातील महत्त्वपूर्ण मानली जाणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानी देण्याला महत्त्व असते. यासाठी बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी सोलापुरातील बकरी बाजारात मोठी गर्दी झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बकरी ईदच्या तीन दिवस आधी बकऱ्यांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या आहेत. किमान 10 हजार ते कमाल दीड लाखांपर्यंत एका बकऱ्याची किंमत आहे.

कुर्बानी दिलेल्या बकऱ्याचे तीन भाग केले जातात. एक हिस्सा स्वत:च्या घरी तर दोन हिस्से गरिबांमध्ये वाटप केले जातात. सकाळच्या विशेष नमाज पठणानंतर ही कुर्बानी दिली जाते. बकरी ईदनंतर एका महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहरम महिना येतो. प्रत्येकाने स्वार्थ त्यागून मानवाच्या कल्याणासाठी सदैव कार्यरत राहावे, अशी शिकवण बकरी ईदच्या माध्यमातून दिली जाते. 

मागील वर्षीपेक्षा यंदा बकऱ्यांचे प्रमाण बाजारात कमी असून मागणी वाढली आहे. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदा दर वाढले असून एका बकऱ्याची किंमत किमान 10 ते 45 हजार रुपयांपर्यंत आहेत. चॉंद असलेल्या बकऱ्याची किंमत मात्र एक ते दीड लाखांहून अधिक आहे, असे दीपक सटाले या बकरी विक्रेत्याने यावेळी सांगितले आहे.

बकऱ्यांच्या जाती व किमती 
तोतापुरी : 15 ते 50 हजार रुपये 
धांग व कोटा : 13 ते 40 हजार रुपये 
बरबरी व सोजत : 16 ते 45 हजार रुपये 
आफ्रिकन बोर : 19 ते 47 हजार रुपये 
जवार उस्मानाबादी : 10 ते 21 हजार रुपये 
राजस्थानी (अजमेरी) : 13 ते 40 हजार रुपये

Web Title: goats rate are increase due to Bkari EID