रिकर्व्ही बेसविरोधात सुप्रिम कोर्टात जाणार : राजू शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

कऱ्हाड : एफआरपी वाढवली असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांच्या खिशातुन 144 रुपये 50 पैसे काढुन घेतले जाणार आहेत. एफआरपीचा बेस साडेनऊवरुन दहा टक्के केला आहे, असे सरकारकडुन सांगितले जात आहे. एफआरपीची छेडछाड करायला संसदेत विधेयक मांडायला लागते. मात्र तसे न करता थेट बेस दहाटक्के केला आहे. त्यामुळे हे बेकायदेशीर असुन त्याविरोधात मी सुप्रिम कोर्टात जाणार आहे, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे केली.

कऱ्हाड (जि.सातारा) येथील दौऱ्यावर आल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडुन एफआरपी वाढवली असे सांगितले जात आहे. मात्र एफआरपी वाढ ही शेतऱ्यांची फसवणुकच आहे. एफआरपीच्या बेसध्ये बदल करण्यास संसदेची परवानी घेणे आवश्यक आहे. मात्र तसे झालेले नाही. त्याविरोधात मी सुप्रिम कोर्टात जाणार आहे.  2750 एफआरपी असेल तर साडेनऊटक्के रिकव्हरीला 144 रुपये 50 पैसे आमच्या खिशातुन काढुन घेतले जाणार आहेत. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची 1400 कोटी रुपयांची फसवणुकच आहे. 

तर सदाभाऊंना स्वाभिमानीत घेवु

मंत्री सदाभाऊ खोत यांनी 3575 रुपये एफआरपी देण्यासाठी सरकारची तिजोरी खाली करु असे वस्तव्य केले आहे. ते मुख्यमंत्री असल्याच्या थाटात सध्या बोलत आहे, असे टिका करुन खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांनी शेतकऱ्यांना 3575 रुपये मिळवुन दिल्यास सदाभाऊंना परत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घेवु, असे आमच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Going to the Supreme Court against the recovery : Raju Shetty