झाडाखाली जाणं जीवावर बेतलं, सोहोलीत महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

सोहोली (ता. कडेगाव) येथे अंगावर वीज पडून रत्नाताई अंकुश कदम (वय 52) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल शनिवारी (ता. 9) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेची कडेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

कडेगाव (सांगली) : सोहोली (ता. कडेगाव) येथे अंगावर वीज पडून रत्नाताई अंकुश कदम (वय 52) यांचा मृत्यू झाला. ही घटना काल शनिवारी (ता. 9) दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेची कडेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोहोली येथे रत्नाताई व अन्य दोन महिला शेतात शेतकाम करण्यासाठी गेल्या होत्या. तर दुपारी दोनच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाळा सुरुवात झाली. या वेळी सोबत असलेल्या अन्य दोन महिलांना शेतात असलेल्या झाडाखाली जावू या असे रत्नाताई म्हणाल्या, अन्‌ त्यानंतर त्या झाडाखाली निवाऱ्याला जात असताना आकाशात विजांचा कडकडाट झाला अन्‌ नेमकी वीज रत्नाताई कदम यांच्या अंगावर पडली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर सोबतच्या महिलांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी तत्काळ कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. 

या घटनेची कडेगाव पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत. वीज चमकत असेल तर शक्‍यतो झाडाखाली थांबू नये, असे सांगितले जाते. कारण, वीज उंच जागी, झाडांवर कोसळते. नारळाच्या झाडांवर वीज कोसळल्याचे अनेक प्रकार पावसाळ्यात पहायला मिळतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Going under a tree is fatal, death of a woman in Soholi