‘गोकुळ’च्या १४ संस्था ‘आय.एस.ओ.’ मानांकित

‘गोकुळ’च्या १४ संस्था  ‘आय.एस.ओ.’ मानांकित

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध संघास (गोकुळ) दूध पुरवठा करणाऱ्या  १४ प्राथमिक दूध संस्थांना आय.एस.ओ. दर्जाचे कामकाज केल्याने ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष श्री. रवींद्र आपटे यांनी दिली.

गेली काही वर्षे या दूध संस्था आय.एस.ओ. मानांकन मिळविण्याकरिता प्रयत्नशील होत्या. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कामकाजामध्ये विविध सुधारणा करत कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याप्रमाणे या दूध संस्थांचे ऑडिट दोन टप्प्यांत करण्यात आले असून, ऑडिट रिपोर्ट टी.यू.व्ही. कंपनीच्या प्रमुख ऑडिटर ज्योती नालसे यांनी वाचून दाखवला.

ऑडिट रिपोर्टमध्ये कोणतीही त्रुटी आढळून आली नसल्याने हे  मानांकन देण्यात आले. याकरिता संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, संकलन विभागाचे व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, सहायक व्यवस्थापक रवींद्र करंबळी, को-ऑर्डिनेटर्स डी. एच. शियेकर व कन्सल्टंट म्हणून रियाज पटवेगार यांनी काम पाहिले. 

आय.एस.ओ. मानांकनाकरिता संकलन विभागाने घालून दिलेल्या कामकाज पद्धतीत दूध संस्थांनी बदल करून दुधाची तपासणी, स्वच्छता, रेकॉर्ड, दुधाची प्रत, सेवा-सुविधांचा वापर, दूध उत्पादकांशी संवाद इत्यादी बाबींमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक दूध संस्थांमध्ये आय.एस.ओ. मानांकनप्राप्त करण्याचा बहुमान या संस्थांना मिळाल्याने ‘गोकुळ’च्या लौकिकात आणखीच भर पडल्याचे श्री. रवींद्र आपटे यांनी स्पष्ट केले. 

मानांकन मिळालेल्या तालुकानिहाय संस्था

  •  करवीर : भोगावती-सडोली, महादेव-शिये, शाहू छत्रपती-शिरोली दु., हनुमान-गाडेगोंडवाडी, हनुमान-वडकशिवाले, राम-चुये 
  •  हातकणंगले ः कामधेनू- मौजे वडगाव
  •  कागल ः बलभीम-बाचणी, कृष्ण-मुरगूड
  •  गडहिंग्लज ः शिवशक्ती-कानडेवाडी
  •  राधानगरी ः हनुमान-घोडवडे
  •  पन्हाळा ः भैरवनाथ- यवलूज, जोतिर्लिंग- माजगाव, महालक्ष्मी-पडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com