गोकुळ बचाव मंच: प्रतिलिटर पाच रुपये वाढ उत्पादकांना द्यावी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

कुडित्रे - "गोकुळ'मध्ये अतिरिक्त कामगार भरती आहे. वासाच्या दुधातून शेतकऱ्याची लूट सुरू आहे. भोंगळ निविदा प्रक्रिया असून वितरण पद्धतीत मलिदा दडलेला आहे. दुसरीकडे एक रुपया दूध दरवाढ करून दूध उत्पादकांची चेष्टाच केली आहे. तातडीने दूध दरवाढ न केल्यास नववर्षाच्या मुहूर्तावर गोकुळवर आंदोलन करू, असा इशारा गोकुळ बचाव मंचच्या वतीने निवास वातकर यांनी दिला.
सांगरुळ येथे मंचच्या कार्यकर्त्यांची पत्रकार बैठक झाली.

श्री. वातकर म्हणाले, ""गाय, म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर पाच रुपये वाढ व्हावी, अशी मागणी केली होती. याउलट म्हशीच्या दुधाला 1 रुपया वाढविला गेला. मग गाईच्या दूध दरवाढीचे पुढे काय झाले? गाईच्या व म्हशीच्या दूध दरामध्ये पाच रुपये वाढ व्हावी.''

संघात अतिरिक्त कामगार भरती केली आहे. निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. वितरक नेमणुकीत मलिदा दडलेला आहे. संपूर्ण धोरण कमिशनचे आहे. 1 रुपया दरवाढ ही दूध उत्पादकांची चेष्टा असून अनुदान देत असल्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. खाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचा दूध व्यवसाय तोट्यात आला आहे. येत्या आठवड्यात मागण्या मान्य न केल्यास लेखी उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा वातकर यांनी दिला.
कृष्णात खाडे म्हणाले, ""म्हैस विकून खाद्य घ्यायला पाहिजे. गाईच्या दुधाला दरवाढ न दिल्यास दूध संस्थांना गाईचे दूध विक्री करण्यास परवानगी द्यावी. पाच रुपये दूध दरवाढ द्यावी.''

बाजीराव खाडे, आनंदा कासोटे, विष्णुपंत खाडे, महेश वातकर, कृष्णात खाडे, जनार्दन खाडे, सुशांत नाळे, संभाजी नाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Gokul milk : 5 Rs increment demanded