दूध बिले त्वरित मिळालीच पाहिजेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 डिसेंबर 2016

आमदार राजेश क्षीरसागर : गोकुळ कर्मचारी आंदोलनास पाठिंबा

कोल्हापूर: जिल्ह्यातील दूध उत्पादकांची बिले त्वरित मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केली. गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

आमदार राजेश क्षीरसागर : गोकुळ कर्मचारी आंदोलनास पाठिंबा

कोल्हापूर: जिल्ह्यातील दूध उत्पादकांची बिले त्वरित मिळाली पाहिजेत, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज केली. गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

आमदार क्षीरसागर म्हणाले, ""जिल्ह्यातील साडेपाच हजार संलग्न दूध संस्थांची आजपर्यंतच्या तीन दूध बिलांची अंदाजे शंभर कोटी रुपये रक्कम चलन तुटवड्यामुळे जिल्हा मध्यवर्ती व इतर बॅंकांमध्ये अडकून पडलेली आहे. याच उत्पादकांना आर्थिक फटका बसला आहे. गोकुळ व्यवस्थापनाने यापूर्वी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे परिस्थितीचे गांभीर्य तसेच संभाव्य धोक्‍याबद्दल कल्पना देऊन यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती केलेली होती. तथापि, यावर आजपर्यंत कोणताही मार्ग न निघाल्याने दूध उत्पादक अडचणीत आलेले आहेत. दूध उत्पादकांची बिले विनाविलंब मिळावीत याकरिता संबंधित बॅंकांना चलन पुरवठा करावा म्हणून गोकुळच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनास कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज भेट दिली. यावेळी बोलताना आ. क्षीरसागर म्हणाले, ""शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी सत्तेमध्ये असतानाही नोटाबंदीसंदर्भात जाहीरपणे वक्तव्य करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. दूध उत्पादक शेतकरी, कामगार, शेतमजूर यांना मोठी झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे शासनाने यामध्ये लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना तत्काळ मिळतील अशी व्यवस्था करावी. असे सांगून गोकुळच्या कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनास आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम, कार्यकारी सदस्य मल्हार पाटील, लक्ष्मण पाटील, उदय पवार, बी. के. पाटील, प्रतिष गायकवाड तसेच गोकुळचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: gokul milk bill