स्वस्त सोन्याच्या आमिषाने एकाला दहा लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

स्वस्तात कळशी भरून सोने देण्याच्या बहाण्याने खराडी (पुणे) येथील व्यापाऱ्याला चौघांनी चिखली (ता. श्रीगोंदे) शिवारात 10 लाख रुपयांना लुटले. अजिनाथ मारुती लोहकरे असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

श्रीगोंदे - स्वस्तात कळशी भरून सोने देण्याच्या बहाण्याने खराडी (पुणे) येथील व्यापाऱ्याला चौघांनी चिखली (ता. श्रीगोंदे) शिवारात 10 लाख रुपयांना लुटले. अजिनाथ मारुती लोहकरे असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

घटनेनंतर तब्बल 15 दिवसांनी लोहकरे यांनी बेलवंडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून "मिस्त्री' नावाच्या व्यक्तीसह त्याचा मेहुणा, भाऊ व एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोहकरे यांचा मित्र प्रदीप भालेराव यांना आरोपी मिस्त्री याने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखविले. विश्वास पटण्यासाठी एक सोन्याचे नाणेही दिले. उर्वरित नाणी घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन चिखली शिवारात बोलाविले. त्यानुसार 5 जुलै रोजी सायंकाळी लोहकरे गेले असता, आरोपींनी त्यांच्या हातात पिशवीत बंद केलेली कळशी देऊन पोबारा केला. लोहकरे यांनी पिशवी उघडून पाहिली असता, कळशीत सोन्याऐवजी माती निघाली. आपण फसविले गेल्याचे लोहकरे यांच्या लक्षात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Cheating Crime