तारण सोने खरंच, माणसंच खोटी

सुधाकर काशीद
गुरुवार, 14 जून 2018

कोल्हापूर - सोन्याच्या तारणावर कर्ज दिले जाते. तारण दिलेले सोने खरे आहे का, याची शाळिग्रामवर घासून खात्री केली जाते. एका छोट्या बटव्यात ते कर्जदारासमोरच सील केले जाते. एवढे करून खऱ्या सोन्याचे रूपांतर काही दिवसांनी बनावट सोन्यात कसे होते? याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतील कर्ज प्रकरणात हे झाले आहे. यानिमित्ताने कर्ज प्रकरणात सोन्याचे मूल्यांकन कसे होते, यावरही प्रकाश पडला आहे.

कोल्हापूर - सोन्याच्या तारणावर कर्ज दिले जाते. तारण दिलेले सोने खरे आहे का, याची शाळिग्रामवर घासून खात्री केली जाते. एका छोट्या बटव्यात ते कर्जदारासमोरच सील केले जाते. एवढे करून खऱ्या सोन्याचे रूपांतर काही दिवसांनी बनावट सोन्यात कसे होते? याची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

जिल्हा बॅंकेच्या कसबा बावडा शाखेतील कर्ज प्रकरणात हे झाले आहे. यानिमित्ताने कर्ज प्रकरणात सोन्याचे मूल्यांकन कसे होते, यावरही प्रकाश पडला आहे.

व्हॅल्युएटर म्हणून बहुतेक ठिकाणी सराफच काम करतात. किंवा व्हॅल्युएटर म्हणून खासगी व्यक्तीही काम पाहू शकतात. व्हॅल्युएटर होण्यासाठी केंद्र शासनाच्या सूक्ष्म लघू मध्यम उद्योग संस्थेचा (एमएसएमई) कोर्स पूर्ण होणे आवश्‍यक असते. सोने तारण घेऊन कर्ज देणाऱ्या बॅंका, पतसंस्था कर्ज देण्यापूर्वी हे सोने अधिकृत व्हॅल्युएटरकडे छाननीसाठी देतात. 

पद्धत अशी आहे की, व्हॅल्युएटरने बॅंकेत येऊन छाननी करावी लागते; पण काही पतसंस्था, बॅंका व्हॅल्युएटरकडे शिपायामार्फत सोने पाठवतात व त्याचे तपशील व्हॅल्युएटरकडून एका फॉर्मवर भरून घेऊन त्याआधारे कर्ज देतात.

कर्जफेड झाल्यानंतर दागिना कर्जदार परत घेऊन जातो; पण ज्यावेळी बटव्यातून हा दागिना बाहेर काढला जातो, त्यावेळी कर्जदाराला संशय येतो व तो हा दागिना आपला नाही, अशी तक्रार करतो. तक्रार झाली की बॅंकेची बदनामी नको, म्हणून काही वेळा प्रकरण लगेच मिटवले जाते किंवा संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यावर कारवाई होते.

वास्तविक, ज्यांनी दागिन्याचे व्हॅल्युएशन केले. त्याच्यासमोरच किंवा त्याच्या सहीनेच दागिना सील केला व उघडतानाही त्याच्यासमोरच उघडला गेला तर असे प्रकार रोखता येणार आहेत; अन्यथा मधल्यामध्ये बॅंकेच्या एखाद्या अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने बटव्यातला दागिना बदलला तर मोठा घोटाळा होणार हे ठरलेलेच. यापूर्वीच्या काही घटनांत काही व्हॅल्युएटरनी सोन्याचे मूल्य चुकीचे किंवा खोटे केल्याचेही उघड झाले आहे.

अर्थात या प्रकरणात दोष सोन्याचा नसतो. सोन्याची अदलाबदल करणाऱ्या व्यक्तींचा असतो. ज्या बटव्यात सोने सील करून बॅंकेतच ठेवले जाते, तिथल्या सुरक्षेचाही प्रश्‍न येतो. बॅंकेचा व्यवस्थापक, कर्जदार व व्हॅल्युएटर यांच्या सह्या असलेले सील बटव्यावर असले तरच असे प्रकार रोखता येणार आहेत. नाही तर हा घोटाळा खूपच गंभीर असणार आहे.

सोने कर्ज तारण प्रकरणात जो घोटाळा होतो तो अधिकारी, कर्मचारी किंवा व्हॅल्युएटर पातळीवर होतो. यात तिन्ही घटकांनी दक्ष राहणे गरजेचे असते. एका पातळीवर जरी दुर्लक्ष झाले तर घोटाळा होऊ शकतो व संपूर्ण व्यवहारावर संशय निर्माण होतो. अर्थात चौकशीतून सत्य बाहेर पडेल. 
- अनिल पाटील, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक.

कस तपासणी
सोन्याचा कस तपासण्यासाठी शाळिग्राम दगड वापरला जातो. त्यावर सोने घासले की सोनेरी चट्टा शाळिग्रामवर उठतो. 

Web Title: Gold Mortgage Loan cheating