खुशखबर... राज्यात डिसेंबरपासून मेगाभरती

तात्या लांडगे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

■ महापरीक्षा सेलकडून सहा महिन्यांचे नियोजन 
■ 72 हजार रिक्त पदांची करणार भरती 
■ पशुसंवर्धन, स्टेट बोर्डाची भरती सुरू 
■ 15 डिसेंबरनंतर होणार वेळापत्रक जाहीर

सोलापूर : शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस, महसूलसह अन्य शासकीय विभागांतील 72 हजार रिक्‍त पदांच्या भरतीला डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. मंत्रालयातील महापरीक्षा सेलने कार्यकारी संचालक अजित पाटील यांच्या पुढाकाराने त्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असा विश्‍वास महापरीक्षा सेलच्या सूत्रांनी व्यक्‍त केला.

'रोहितने माझ्या नावाचा उल्लेख केला हे माझ्यासाठी...' : सुनंदा पवार

पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर, डॉक्‍टरसह अन्य रिक्‍त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डमधील रिक्‍त पदांचीही भरती डिसेंबरमध्ये होणार आहे. डिसेंबर 2019 पासून राज्यातील विविध विभागांमधील रिक्‍त पदे भरतीचे ठोस नियोजन केले जाणार आहे. शासकीय कार्यालयांकडून रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून त्यानुसार तब्बल 72 हजार पदांची भरती होणार आहे. 15 डिसेंबरनंतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. बहुतांश विभागांतील रिक्‍त पदांची भरती एकाचवेळी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची भरती प्रक्रिया सुरू होईल, असे नियोजन केले आहे. सरकार स्थापन झाल्याने त्याला गती येईल, असा विश्‍वासही महापरीक्षा सेलच्या सूत्रांनी व्यक्‍त केला.

सोलापूर जिल्ह्यातील या आमदारांनी घेतली शपथ 

ठळक बाबी... 
■ पशुसंवर्धन व महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डमधील रिक्‍त पदांच्या भरतीपासून मेगा भरतीची सुरवात 
■ 15 डिसेंबरनंतर पोलिस अन्‌ जिल्हा परिषद, आरोग्य विभागातील रिक्‍त पदे भरतीचे नियोजन 
■ महापरीक्षा सेलच्या नियोजनानुसार जून 2020 पर्यंत पूर्ण होणार 72 हजार रिक्‍त पदांची भरती 
■ शासकीय विभागांमधील बहुतांश रिक्‍त पदांची एकाचवेळी होणार भरती : सर्वांना मिळणार संधी 
■ पशुसंवर्धन विभागातील सुमारे आठ हजार रिक्‍त पदांसाठी तब्बल दीड लाखांहून अधिक अर्ज 

https://www.esakal.com/paschim-maharashtra/onion-prices-fell-238921

रिक्त पदांची माहिती मागविली 
राज्य शासनाच्या विविध कार्यालयांतील रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून महापरीक्षा सेलच्या माध्यमातून मेगा भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील, असे नियोजन महापरीक्षा सेलने केले आहे. 
- सीताराम कुंटे, अव्वर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news... big recruitment in the state from December