डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज 

 Good news for pomegranate farmers
Good news for pomegranate farmers

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस आणि खानापूर तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक 12 हजार 343 शेतकरी यांना 31 कोटी 38 लाख रुपये विमा रक्कम मिळणार आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक 23 कोटी 24 हजार रुपये तर पलूस तालुक्‍यात सर्वात कमी 40 हजार 700 रुपये विमा रक्कम प्राप्त झाली आहे.

जिल्ह्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिवर्षी प्रचंड नुकसान होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीची थोड्या प्रमाणात का होईना भरपाई मिळावी यासाठी फळ पीक विमा उतरला जातो. जिल्ह्यात आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्‍यात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्या खालोखाल तासगाव, खानापूर आणि पलूस तालुक्‍यातही डाळिंब उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता. 

डाळिंब उत्पादकांसाठी 147 कोटी 9 लाख रुपये विमा संरक्षित करण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सात कोटी 35 लाख रुपयांचा हप्ता भरण्यात आला होता. जिल्ह्यातील 12 हजार 156 हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. 

डाळिंब पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील 12 हजार 343 शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतीक्षा लागून राहिली होती. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 31 कोटी 38 लाख रुपये जिल्हा बॅंकेकडे जमा झाले आहेत. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. सध्या "कोरोना' मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशावेळी दुष्काळी भागातील डाळिंब उत्पादकांना पीक विम्याची रक्‍कम मिळणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. 

डाळिंब उत्पादकांना मिळणारी भरपाई 
तासगाव तालुका- 11 लाख 75 हजार रुपये, पलूस 40 हजार 06 रुपये, जत 6 कोटी 79 लाख रुपये, कवठेमहांकाळ 1 कोटी 46 लाख रुपये, आटपाडी-23 कोटी 74 लाख रुपये, खानापूर- 1 लाख 16 हजार रुपये याप्रमाणे 31 कोटी 38 लाख रुपये भरपाई मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com