गुड न्यूज... ... वैद्यकीय पाठोपाठ वेळापत्रक बदलाबाबत कुलपतींना सुचना ...मंत्री अमित देशमुख

विष्णू मोहिते
Monday, 15 June 2020

सांगली  ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवरही राज्यातील वैद्यकीयच्या अंतिम वर्षाच्या ( 4 थे) परिक्षा घेतल्या जाणार आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची सरकार काळजी घेत आहे. सध्या जाहिर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकात एकापाठोपाठ एक पेपर जाहिर केले आहेत. दरवर्षीप्रमाणेच पारंपारिक वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहिर करण्याच्या सूचना कुलपतींना दिल्या आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. वैद्यकीयच्या अन्य तीनही वर्षातील परिक्षांपूर्वी अभ्यासासाठी पुरेसा कालावधी दिलाच जाईल, असेही ते म्हणाले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख सांगली जिल्ह्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. सांगलीत त्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर मंत्री श्री. देशमुख यांच्याशी वैद्यकीय क्षेत्रातील विविध प्रश्‍नांबाबत संपर्क साधला.

राज्यातील वैद्यकीय परीक्षा एम.बी.बी.एस, बी. डी. एस. बी. ए. एम. एस, बी. एच. एम, एस, बी. यु. एम, एससह डीफार्म, बी फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 15 जुलै 2020 नंतर होतील, असे जाहिर झाले आहे. त्यामध्ये सध्या जाहिर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकात सलग एकापाठोपाठ आठ पेपर घेतले जाणार आहेत, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परस्थिती निर्माण झालेली आहे. एका दिवसात केवळ फेरवाचनही होणार नाही याची भीती त्यांच्यात आहे. बाबत मंत्री देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले, अंतिम वर्षाचे तात्पुरते वेळापत्रक जाहिर झालेले आहे. अद्याप अंतिम वेळापत्रक जाहिर झालेले नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवरही दरवर्षीप्रमाणेच वेळापत्रक रहावे, अश्‍या सूचना कुलपतींना केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची सरकार काळजी घेत आहे. त्यांना अभ्यासाठी घरी पुस्तके, त्यांची परीक्षा जरी जिल्ह्यात झाली तरी प्रात्यक्षित परिक्षेसाठी महाविद्यालयात जाण्यासाठी वाहन व्यवस्था, महाविद्यालयात त्यांच्यासाठी मेसची व्यवस्थेचा विचार केला जाईल.' 

वैद्यकीयच्या पहिल्या तीन वर्षाच्या परिक्षेबाबत मंत्री देशमुख म्हणाले, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या मुलांसाठी पुढील वर्षाचे वर्ग ऑनलाईन सुरु केले जातील. ते सध्या ज्या वर्गात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या परीक्षा वेळापत्रक जाहिर केल्यानंतर त्यांना अभ्यासाठी पुरेसा कालावधी दिलाच जाईल. तशी पूर्वकल्पना दिली जाईल. हा अवधी 45 दिवसाचाही असू शकेल.' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news...Notice to the Chancellor regarding the change of schedule following the medical ... Minister Amit Deshmukh