सोलापूर : शहर मध्यच्या परिवर्तनाची 'हीच ती वेळ' 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

सोलापूर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हीच ती वेळचे घोषवाक्‍य घेऊन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांमध्ये स्फुरण भरले आहे. हीच ती वेळ या वाक्‍याने राज्यातील शिवसैनिकांमध्ये जोश संचारला आहे.

सोलापूर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हीच ती वेळचे घोषवाक्‍य घेऊन यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांमध्ये स्फुरण भरले आहे. हीच ती वेळ या वाक्‍याने राज्यातील शिवसैनिकांमध्ये जोश संचारला आहे.

सोलापूर शहर मध्यमधील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप माने यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचंड ताकदीने मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत शहर मध्यमध्ये जनतेतून महायुतीला मिळणारा प्रतिसाद पाहता शहर मध्यच्या परिवर्तनाची "हीच ती वेळ' असल्याचा आत्मविश्‍वास महायुतीच्या कार्यकर्त्यांना आला असल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी व्यक्त केला. 

ठोंगे - पाटील म्हणाले,  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जाती-धर्म यांना सोबत घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू ठेवली आहे. सर्वसामान्य जनतेतून महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असून या निवडणुकीत महायुती अभूतपूर्व यश मिळेल. सोलापूर शहर मध्यचे उमेदवार दिलीप माने म्हणाले, शहर मध्य हा सोलापूरचा चेहरा आहे.

दरम्यान, गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात ठोस विकास कामे झाली नाहीत. कामगारांच्या भावनांचा वापर आजपर्यंत राजकीय स्वार्थासाठीच झाल्याने आता कामगारांचा आश्‍वासनांवर विश्‍वास राहिला नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून त्यांना विकासाच्या अपेक्षा आहेत. केंद्रात आणि राज्यात ज्या विचारांचे सरकार आहे. त्याच विचाराचा आपला लोकप्रतिनिधी असावा यासाठी येथील जनता महायुतीला संधी देईल.l


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good response to Shiv Sena in Solapur city