सोलापूर महापालिका पोटनिवडणुकीत पहिल्या चार तासात 16.38 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदार अजून बाहेर पडलेले नाहीत. दुपारी चारनंतर मतदानासाठी रांगा लागण्याची शक्‍यता आहे.
 

सोलापूर - महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीत पहिल्या चार तासांमध्ये 16.38 टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत साडेसहा टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासांत म्हणजे साडेअकरा वाजेपर्यंत ही टक्केवारी 16.38 टक्‍क्‍यांवर पोहोचली. उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदार अजून बाहेर पडलेले नाहीत. दुपारी चारनंतर मतदानासाठी रांगा लागण्याची शक्‍यता आहे.

एकूण 39 केंद्रांवर मतदान होत असून, 34 केंद्र ही अतिसंवेदनशील आहे. त्या ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्तासह सीसी टीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत किरकोळ बाचाबाची व हुल्लबाजीचे एक-दोन प्रकार झाले. त्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. माणेकरी शाळेच्या केंद्रावर दृष्टीहीन महिलेने मुलाच्या मदतीने मतदान केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: good response to solapur municipal bypolls