विकास कामांचा मतांशी संबंध राहिला नाही हे दुर्दैव

सनी सोनावळे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

टाकळी ढोकेश्वर - पळशी(ता.पारनेर)येथे जिल्हा परिषद मार्फत राज्य शासनाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत माळवाडी ते नागापुरवाडी रस्त्याचे भुमिपुजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना, केवळ निवडणुकांपुरताच दृष्टिकोन ठेवणारी पध्दती विकासाला मारक ठरलेली आहे. पळशी गावांत आजपर्यंत ९ कोटीहुन अधिक विकासकामे केली. परंतु मतांत मात्र त्यांचे रूपांतर झाले नाही. विकासाचा आणि मतांचा संबंध राहीला नाही हे दुर्दैव आहे असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी व्यक्त केले.  

झावरे म्हणाले, जनतेसाठी विकासकामे करतच राहणार आहे. या परिसरासाठी स्व.वसंतराव दादांनी मोठे काम केले व मी ही करीत राहणार आहे. निवडणुका जवळ आल्या की कशा प्रकारची चक्रे फिरू लागतात हे पाहिले की सामान्य माणूस चक्रावून गेल्याशिवाय राहात नाही. निवडून येणार्‍यांना पाच वर्षे कोणती कामे करायची आहेत, याचा पूर्ण कृती कार्यक्रम दिला पाहिजे. तो पूर्ण करण्याचे बंधन त्यांच्यावर असले पाहिजे. यावेळी माजी सरपंच मिठू जाधव, संतोष जाधव, किसन वाळुंज, रामचंद्र जाधव, बाळासाहेब गागरे, शेखर साळवे, विष्णु मधे, इंदुमतीताई मेंगाळ, भागाभाऊ मेंगाळ उपस्थित होते.

Web Title: good work elections sujeet zawre