Loksabha 2019 :पडळकरांनी घेतली आंबेडकरांची भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

आटपाडी - भारतीय जनता पक्षाचे बंडखोर उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथे भेट घेतली. या भेटीत सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीवरून चर्चा झाली. उद्या (ता. २) सांगली येथे वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी पडळकर यांना देण्याबाबत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

भाजपने विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली होती. 

वंचित बहुजन आघाडीने जयसिंग शेंडगे यांच्या नावाची घोषणा केली होती; त्यानंतर प्रकाश शेंडगे यांचे नाव चर्चेत आले. या दोघांनीही पडळकर वंचित आघाडीतून लढल्यास माघार घेण्याची तयारी दर्शविली आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारीवरून काल (ता. ३१) पडळकर आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींची बैठक झाली. पडळकर यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथे रात्री उशिरा नियोजित भेट घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील उमेदवारीवरून सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या सांगली येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री. पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत.

Web Title: Gopichand Padalkar meets Prakash Ambedkar