सोलापूर जिल्ह्यातील छावणी चालकांना आश्वासन

सोलापूर जिल्ह्यातील छावणी चालकांना आश्वासन

सांगोला : चारा छावणीच्या बिलापोटी शासनाकडे उपलब्ध असलेली रक्कम येत्या चार दिवसाच्या आत तातडीने चारा छावणी चालकांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी तहसीलदार यांना दिले आहेत. उर्वरित बिलापोटी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. लवकरात लवकर चारा छावणी चालकांच्या बिलाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास चारा छावणी चालकांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

चारा छावण्या बंद होऊन एक महिना उलटला तरीही प्रशासनाकडून प्रलंबित बिलाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. परिणामी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेले छावणी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याचे काम करणाऱ्या चारा छावणी चालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मदत व पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या बैठकीनंतर सोमवारी (ता. 18) जिल्हाधिकारी कार्यालयात माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्यातील चारा छावणी चालकांची बैठक झाली. या बैठकीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील, प्रांताधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार योगेश खरमाटे, सोलापूर जिल्ह्यातील चारा छावणी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चारा छावण्या बंद होऊन एक महिना उलटला तरी छावणी चालकांची शासनाकडे प्रलंबित असलेली कोट्यावधी रुपयांची बिले अदा करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. यामुळे छावणी चालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन साळुंखे-पाटील यांना दिले होते. त्यावर साळुंखे- पाटील यांनी पुढाकार घेत सर्व छावणी चालक व मदत पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांची 15 तारखेला विधानभवन येथील सभापती दालनात समन्वय बैठक झाली होती. आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चारा छावणी चालकांना न्याय देण्याच्या दृष्टीने शासनाकडे उपलब्ध रक्कम चारा छावणी चालकांना येत्या चार दिवसात केली जाईल. उर्वरित रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असा विश्वास दिला. त्यामुळे मागील अनेक दिवसापासून चारा छावणी चालकांच्या बिलाचा रखडलेला प्रश्न मार्गे लागल्यामुळे चारा छावणी चालक आतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com