पावणेसात लाख मुलांना गोवर-रुबेला लसीकरण

Vaccine
Vaccine

सातारा - जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आजवर सहा लाख ७७ हजार ६६६ मुलांना लसीकरण केले आहे. आता ५५ हजार ९०४ मुलांना लसीकरण करणे बाकी असून, त्यात प्राधान्याने सातारा शहर, महाबळेश्‍वर व माण तालुक्‍यांतील काही भागातील मुलांचा समावेश आहे.

देशभरात गोवर आणि रुबेलाचा संसर्ग होऊ नये म्हणून बालकांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढविणे, गोवरमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण व रुबेलाचे रुग्ण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत गोवर व रुबेलाचे लसीकरण केले जात आहे. हवेतून पसरणाऱ्या संसर्गजन्य थेंबामुळे गोवरचा फैलाव होतो. रुबेला झालेली व्यक्‍ती शिंकते तेव्हा हवेत उडालेले थेंब हवेत पसरून रुबेलाचा संसर्ग होत असतो. हा विषाणू गर्भवती महिलांकडून त्यांच्या गर्भापर्यंत पोचण्याची शक्‍यता दाट असते. भारतामध्ये १५ वर्षांखालील बालकांना गोवर, रुबेलाचा संसर्ग सर्वाधिक होत असतो. 

सातारा जिल्ह्यात ही मोहीम २७ नोव्हेंबरपर्यंत राबविली आहे. त्यात सात लाख ३३ हजार ५७० मुलांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागापुढे ठेवण्यात आले होते. ते आरोग्य विभागाने ९२.३८ टक्‍के पूर्ण केले आहे. नऊ महिने पूर्ण झालेले ते १५ वर्षांखालील सर्व मुला-मुलींना लस दिली जात आहे. ज्यांनी यापूर्वी गोवर/एमआर/ एमएमआर लस टोचली असेल अथवा नसेल तरीही लस देण्यात आली. जिल्ह्यातील तीन हजार ८३० शाळांमध्ये सुमारे पाच हजार लसीकरण सत्रे, तसेच तीन हजार बाह्य संपर्क सत्रे आयोजित केली होती, अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. सध्या ५५ हजार ९०४ बालकांना लसीकरण करणे बाकी आहे. त्यासाठी सातारा शहर परिसरातील विभाग, महाबळेश्‍वर व माण तालुक्‍यांतील काही भागांत हे लसीकरण केले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com