गोवर-रुबेला लसीमुळे 536 विद्यार्थ्यांना भोवळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील एक कोटी 15 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे.

सोलापूर - राज्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील एक कोटी 15 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे.

लसीकरणादरम्यान आतापर्यंत 536 विद्यार्थ्यांना भोवळ आली असून, पाच विद्यार्थ्यांना जास्त दिवस उपचार करावे लागल्याची नोंद राज्याच्या कुटुंब कल्याण कार्यालयाकडे झाली आहे. याचा परिणाम लसीकरणावर झाला असून, जालना, बीड, परभणी, बुलढाणा व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 26 टक्‍केच लसीकरण झाल्याचे कुटुंब कल्याण नियोजन विभागाचे सहसंचालक दिलीप पाटील यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. या योजनेंतर्गत जानेवारीपर्यंत राज्यातील तीन कोटी 11 लाख विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: Govar Rubela Vaccination Student Giddy