सरकार, केंद्र बंद आहे; सांगा ना, तूर ठेवू कुठे?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे २००० क्विंटल शिल्लक

सांगली - हमीभावात तूर विकण्यासाठी जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र शासनाने खरेदी केंद्रच बंद केले आहे. तूर विकायची कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जत तालुक्‍यासह आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत २,१०० क्विंटलहून अधिक तूर शिल्लक आहे, असा अंदाज आहे. खरेदी केंद्र बंद असल्याने व तूर ठेवण्यासाठी गोदामच नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तरी तूर घरीच ठेवणे पसंत केले आहे.

जत तालुक्‍यात ६५०० हेक्‍टरवर तुरीचा पेरा झाला होता. जत तालुक्‍यात शेतमाल ठेवण्यासाठी ना शासकीय गोदाम आहे, ना बाजार समितीचे. ‘तूर कुठे ठेवायची’, असा सवाल शेतकरी करत आहेत. 

सांगलीतील वेअर हाऊसमधील नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंद आहे. जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर तूर विक्रीसाठी आणण्याकडे पाठ फिरवली. त्याचे कारण म्हणजे जत-सांगली हे अंतर १०५ किलोमीटर आहे. तुरीची ने-आण करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरातच तुरीचा साठा केला आहे. तूर घरात ठेवल्याने भुरीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याचा धोका आहे. जतमधील शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीला हमीभाव ५०५० रुपये देऊन खरेदी करावी, अशी मागणी उत्पादक शेतकरी करीत आहेत.

बारदान नाही म्हणून तूर विकली नाही. आता तूर विक्रीची मुदत संपली आहे. २० क्विंटल तूर घरातच ठेवली. कमी दरात विकावी लागते. जनावरांना खाद्य म्हणून घालणार आहे.
- कामान्ना पाटील, शेतकरी, संख (जि. सांगली)

Web Title: government, the center is closed; Do not tell, where to put a turdal?