सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना जुंपले कामाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

सोलापूर - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सरकारच्या कामगिरीचा आलेख जनता दरबारात मांडता यावा, यासाठी सरकारने आता जिल्हाधिकाऱ्यांनाच कामाला जुंपले आहे. आघाडी सरकार व सध्याच्या युती सरकारच्या कामगिरीचा तुलनात्मक अहवाल देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक ‘एक्‍सेल शीट’ पाठविण्यात आले असून, प्रत्येक योजनांची माहिती मागविली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील साडेचार वर्षांत कोणकोणत्या योजनांमध्ये उत्तम कामगिरी केली, त्यामध्ये किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आणि यापूर्वीच्या सरकारच्या काळात काय स्थिती होती, याची तुलनात्मक माहिती जानेवारीपर्यंत देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार बॅंका, जिल्हा उपनिबंधक, आरोग्य विभागासह कृषी विभागाच्याही अधिकाऱ्यांकडून माहिती संकलित केली जात आहे. 

विद्यमान सरकारच्या काळात काहीच काम झाले नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न सरकार या माहितीच्या आधारे करणार असल्याचे समजते.

Web Title: Government Collector Work Loksabha Vidhansabha Election