सरकारी कर्मचारी उद्यापासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सातारा - राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची राज्य सरकारने पूर्तता न केल्याने सात ते नऊ ऑगस्ट रोजी सर्व कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनचे सातारा जिल्हाप्रमुख विनोद नलवडे आणि सचिव महेंद्र गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासकीय आणि निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तीन वर्षांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. सातवा वेतन आयोग, थकीत महागाई भत्ता, कर्मचारी भरती, महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे रजा, अनुकंपा नियम दुरुस्ती, अंशदायी पेन्शन योजना रद्द करणे, आरोग्य खात्यातील परिचरांना किमान वेतन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे आदी मागण्यांसाठी तीन दिवसांच्या संपावर जात असल्याचे नलवडे व गोसावी यांनी नमूद केले.

Web Title: government employee on strike