संपातील सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतले तोंडसुख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सोलापूर : संपातून आयत्यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाने घेतलेली माघार आणि सातवा वेतन आयोग देण्यासाठी अपयशी ठरलेले राज्यकर्ते यांच्यावर आज सरकारी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला. राजपत्रित अधिकारी आणि राज्यकर्ते कोट्यावधीची माया जमवितात. सरकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात अशा भावना व्यक्त केल्या. जोपर्यंत सातवा वेतन आयोग मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असाच निर्धार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात व्यक्त करण्यात आला.

सातवा वेतन आयोगासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचा आजचा तिसरा व शेवटचा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या बाजूस असलेल्या प्रवेशद्वासमोर एकत्रित येत आपल्या भावना व्यक्त केल्या. महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, तंत्रशिक्षण, कोतवाल, शिक्षक यासह इतर राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपला रोष व्यक्त केला. मुंबईत सुरू असलेल्या समन्वय बैठकीत जो निर्णय होईल त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

संपावेळी आयत्या बाहेर पडल्यामुळे आम्ही राजपत्रित कर्मचारी महासंघाचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री, त्यांच्या सरकारमधील मंत्रीही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सातवा वेतन आयोग द्या अन्यथा राज्यभरात मंत्र्यांना फिरणे मुश्‍कील करू.
 
- दत्तात्रेय वाघमारे, तंत्रनिकेतन कर्मचारी संघटना

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जानेवारीमध्ये सातवा वेतन आयोग मिळाला. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही नाही. राज्यकर्ते मस्तवाल झाले आहेत. मस्तवाल राज्यकर्त्यांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी एकीची वज्रमुठ करावी. ऑनलाईनच्या नावाखाली प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांना कोट्यवधीची लाच मिळत आहे. 

- शिवानंद भरले, जिल्हा परिषद शिक्षक संघ 

Web Title: Government employees speck against senior officer and government