मोहोळमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

राजकुमार शहा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मोहोळ येथे विविध कामासाठी ग्रामीण भागातुन येणाऱ्या सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसला असुन त्यांचा वेळ व पैसा वाया गेला.

मोहोळ - मोहोळ येथे विविध कामासाठी ग्रामीण भागातुन येणाऱ्या सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात बसला असुन त्यांचा वेळ व पैसा वाया गेला.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाची माहीती वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्यांना नव्हती. मोहोळ येथे आल्यावर त्यांना समजली. आज अनेक कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या जलसंधारण विभागात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले.

संपात पंचायत समिती, जलसंधारण विभाग, भुमि अभिलेख, शिक्षण, कृषी, तहसील सहभागी झाले होते.

Web Title: Government employees strike in Mohol