वॉटर कप स्पर्धेसाठी शासनाने केला मदतीचा हात पुढे

अक्षय गुंड
गुरुवार, 12 एप्रिल 2018

शासनाने वॉटर कप स्पर्धेच्या मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कामासाठी दीड लाख रूपये इतका निधी इंधन खर्चासाठी उपलब्ध करून दिला आहे. तरी ग्रामपंचायतीने मशीनद्वारे केलेल्या कामांचा तपशील स्वतंत्रपणे ठेवुन निधीचा वापर करावा. 
- सदाशिव पडदुणे, तहसीलदार माढा.

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) : सध्या राज्यातील २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यात सिनेअभिनेता आमीर खान यांच्या संकल्पनेतून लोकांच्या श्रमदानातुन सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. वॉटर कप स्पर्धेत जी गावे सहभागी होतील. त्या गावामध्ये मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कामासाठी इंधनाच्या खर्चापोटी प्रत्येकी दिड लाख रूपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निधी जलयुक्त शिवारमधून दिला जाणार आहे. 

२०१६-१७ पासुन पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येते. चालु वर्षांत हि स्पर्धा २४ जिल्ह्यातील ७५ तालुक्यात घेण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे राज्यात जलसंधारणाची चळवळ उभी राहत आहे. स्पर्धेच्या गावात उत्साह टिकावा व जास्तीत गावे पाणीदार व्हावेत. यासाठी स्पर्धेतील सहभागी होणार्यां प्रत्येक गावास दीड लाख रूपये मर्यादित निधी दिला जाणार आहे. 

टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ हा उद्देश ठेवुन जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानास पुरक म्हणुन खाजगी व्यक्ती व अशासकीय संस्था, ग्रामपंचायत यंत्रसामग्री उपलब्ध करून देतात. चालु वर्षांत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धत जी गावे सहभागी होऊन मृद व जलसंधारणाची कामे श्रमदानाद्वारे करतील. अशा गावांना प्रोत्साहन म्हणुन मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कामाकरीता इंधन खर्चासाठी शासनाकडुन प्रत्येकी गावास दीड लाख रूपये निधी जलयुक्त शिवार मधुन देण्यात येणार आहे.

शासनाने वॉटर कप स्पर्धेच्या मशीनद्वारे करण्यात येणाऱ्या कामासाठी दीड लाख रूपये इतका निधी इंधन खर्चासाठी उपलब्ध करून दिला आहे. तरी ग्रामपंचायतीने मशीनद्वारे केलेल्या कामांचा तपशील स्वतंत्रपणे ठेवुन निधीचा वापर करावा. 
- सदाशिव पडदुणे, तहसीलदार माढा.

Web Title: government fund on water cup