सरकार पावले उचलत नसल्यामुळे मंगळवेढ्यात अर्धनग्न आंदोलन

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज सरकार पावले उचलत नसल्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. 

मंगळवेढा - सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज सरकार पावले उचलत नसल्यामुळे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी, शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत, नगरसेवक राहूल सावंजी, चंद्रशेखर कौडूभैरी, शरद हेबांडे, सतीश दत्तु, आबा हेंबाडे, हर्षद डोरले, बलवान वाकडे, शिवाजी वाकडे, दिपक घुले, रामेश्वर पवार, नितीन इंगळे उदयसिंह इंगळे, व्दिग्विजय वाकडे उमेश आवताडे, शैलेश गोवे, दामाजी मोरे, आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. येथील दामाजी चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी  व्हावी, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता.1 ऑगस्ट पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरू झाले.

Web Title: government has not taken steps due to movement in mangalvedha