मंगळवेढ्यातील शासकीय कार्यालयाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

हुकूम मुलाणी
रविवार, 9 डिसेंबर 2018

मंगळवेढा : पोलीस ठाण्याच्या आवारातून वाहन चोरून नेल्याची घटना ताजी असताना तहसील कार्यालयाच्या आवारात लावलेला सोनालिका कंपनीचा टॅक्टर टॉलीसह पळवून नेल्याप्रकरणी तलाठी विजय एकतपुरे यांनी एकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाने शहरात असलेल्या शासकीय कार्यालयाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला.

भिमानदी काठच्या सिध्दापूर तांडोर परिसरात वाळू चोरीच्या घटना वारंवार घडत असून यासाठी नेमलेल्या महसूल पथकाने कारवाई केली असताना तांडोर येथील कोतवालाने दिलेल्या माहितीनुसार, कारवाईसाठी गेलेल्या पथकाला हणमंत प्रभारक गोसावी (रा. ब्रम्हपुरी) यांच्या मालकीचा सोनालिका कंपनी टॅक्टर (एम. एच. 095798) व विना क्रमांकाची टॉली एक ब्रास वाळूसह ताब्यात घेतला सदरची वाळू बोराळे येथील शेतकऱ्यांच्या शेतात टाकली असून चार लाख किंमतीचा टॅक्टर टॉलीस मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावला.

गौण खनिज विभागाने या कारवाईची नोटीस लावण्यास टॅक्टरचा शोध घेतला असता आढळून आला नसल्याने तलाठी एकतपुरे यांनी हणमंत प्रभाकर गोसावी (रा. ब्रम्हपुरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुर्व भागात वाळू चोरीच्या घटना वारंवार घडत असून महसूल पथकाने कारवाईतील वाहने मात्र सरंक्षक भिंत नसलेल्या तहसील कार्यालयाच्या आवारात लावली. पण या मोकळया जागेतून वाहून चोरुन नेणे देखील महसूल खात्याच्या आशिर्वादाने शक्य होत असल्याने वाळूवरील कारवाई म्हणजे 'तु कर मारल्यासारखे, मी करतो रडल्यासारखे' अशी होत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

Web Title: Government Office Security Issues on stake