सरकारी शाळा शंभर टक्के 'डिजीटल'च्या मार्गावर

Government schools 100 percent on digital
Government schools 100 percent on digital

सोलापूर : केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याला मिळालेली डिजीटल स्कूलची जोड यामुळे शहरातील महापालिका शाळांकडे खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याचवेळी कसहभागातून महापालिकेच्या सर्व शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर आहेत. 59 पैकी 57 शाळा डिजीटल झाल्या असून, उर्वरीत तीन शाळाही लवकरच डिजीटल होतील असा विश्‍वास प्रशासनाधिकारी सुधा साळुंके यांनी व्यक्त केला आहे. 

जिल्हा परिषदांच्या शाळा 'डिजीटल' व्हाव्यात यासाठी 'सकाळ'ने विशेष उपक्रम राबविले. त्याचवेळी महापालिका शाळाही काळाच्या बरोबरीने चालाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचाच परिणाम होऊन अनेक संस्थांनी व व्यक्तींनी महापालिकेच्या शाळाही डिजीटल होण्यासाठी आपापला वाटा उचलला. त्याचीच परिणीती आज 57 शाळा डिजीटल होण्यात झाली आहे.

शहराच्या विविध खासगी शाळांतील सुमारे 250 विद्यार्थ्यांनी महापालिकेच्या 59 शाळांत प्रवेश घेतला असून गतवर्षीच्या तुलनेत पटही हजार विद्यार्थ्यांनी वाढला आहे. खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी महापालिका शाळांसमोर निर्माण केलेले अस्तित्वाचे आव्हान... विद्यादानापेक्षा इतर कामांमध्ये व्यस्त असलेले शिक्षक... विद्यार्थ्यांची सोडाच येथील शिक्षकांचीच गुणवत्ता तोंडात बोट घालायला लावणारी....या सर्वांमुळे पालकांनी महापालिका शाळांकडे फिरवलेली पाठ...अशी स्थिती दोन-तीन वर्षांपूर्वी होती. मात्र, आता त्यात मोठा सकारात्मक बदल झाला असून, खासगी शाळांप्रमाणे महापालिका शाळेतही तितक्‍याच गुणवत्तेचे शिक्षण मिळत आहे. 

एलकेजीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक क्षेत्रात भयंकर स्पर्धा निर्माण झाली असताना महापालिकेच्या शाळा हळूहळू नामशेष होऊ लागल्या होत्या. शैक्षणिक स्पर्धेत महापालिकेच्या शाळा ताठ मानेने उभ्या राहाव्यात, यासाठी गुणवत्ता विकासाचा ध्यास विद्यमान शिक्षकांनी घेतला आणि शाळांचे स्वरूप बदलू लागले. या शिवाय सेमी इंग्रजी, ई-लर्निंग, विद्यार्थ्यांचा भावनांक काढणे, तिसरी व सहावीसाठी प्रज्ञा शोध परीक्षा, वाचन व भाषण स्पर्धा असे विविध उपक्रम सुरू आहेत.

माध्यम एकूण शाळा डिजीटल शाळा 

मराठी 31 29

उर्दू 22 22

तेलगु 02 02 

कन्नड 03 03 

सेमी इंग्लीश 01 01
एकूण 59    57 

महापालिका शाळांमध्ये गुणवत्तेसह भौतिक सुविधाही वाढल्या आहेत. खासगी शाळांच्या धर्तीवर या शाळांतही अत्याधुनिक सुविधा असल्याने पालकांचा ओढा सरकारी शाळांकडे वाढला आहे. उर्दू माध्यमाच्या सर्व 22 शाळा डिजीटल झाल्या आहेत, तर मराठी माध्यमाच्या 31 पैकी 29 डिजीटल झाल्या आहेत. 

- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com