संपामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प

सदानंद पाटील
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे . मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत कडकडीत बंद करण्यात आला.

कोल्हापूर - राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे . मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत कडकडीत बंद करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कमर्चारी एकत्र आले व त्यांनी तेथे निदर्शने केली. कर्मचारी, वाहन चालक रजेवर असल्याने खाते प्रमुखांना स्वतःचे वाहन घेऊन कार्यालयात यावे लागले.

जिल्हा परिषदेच्या 53 संघटना आणि  15 हजार कर्मचारी संपावर गेल्याने मिनी मंत्रालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींनी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कोणी कर्मचारी काम करत आहेत याची खात्री केली. मात्र एकही कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले नाही.

अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कर्मचारी व संघटना प्रतिनिधींनी सभा घेऊन सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

Web Title: Government servant on stick