#SataraFlood पूरग्रस्तांना तातडीने मदत करा : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी व त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले. 

कऱ्हाड : पूर परिस्थितीमुळे सातारा, सांगली, काेल्हापूर येथील लाेकांचा संसार वाहून गेला आहे. पूरग्रस्तांना शासनाने तातडीने मदत केली पाहिजे. शेती वाहून गेली आहे. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी व त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन व्हावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे भाेसले यांनी नमूद केले. 
 खासदार उदयनराजे यांना पुरस्थितीची पहाणी केली. त्यानंतर येथील शाळा क्रमांक तीनमध्ये स्थलांतर झालेल्या पुरग्रस्तांशीही संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. 
दरम्यान खासदार उदयनराजे म्हणाले, कऱ्हाडला 1976 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पुराचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे पंधरा वर्षानंतर नुकसान झाले आहे. त्या पुरात नुकसान होवू नये, यासाठी विशेष आराखडा आखण्याची गरज आहे. पुर आला की, सातत्याने पाण्याखाली जाणाऱ्या झोपडपडपट्ट्याचे पुनर्वसन व्हावे, यासाठी पालिका स्तरावर विशेष आऱाखडा आखण्यासाठी प्रयत्न करावेत. वास्तविक केंद्राच्या घरकुल योजनेतून अशा लोकांना घरे देण्याची सोय आहे. त्यामुळे कऱ्हाडसह जिल्ह्यातील अन्य पालिकांना घरकूलमधून घरे देण्याची व्यवस्था आहे.
कऱ्हाडसह सातारा व जिल्ह्यालाच झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. येथील पालिकेनेही त्यासाठी प्रयत्न करावेत. पाटण कॉलनीसह ज्या भागात झोपडपट्टी धारकांचा एक आराखडा करून द्यावा. त्यासाठी पालिकेची कोठे जागा आहे, त्याचीही माहिती सोबत द्यावी. त्या सगळ्यांना घरे देण्यासाठी योग्य तो निधी देण्यासाठी प्रयत्न करेन. कोणीही काहीही म्हटले तरी निधी आणून या लोकांना घेरे देण्यासाठी माझा प्रमाणीक प्रयत्न असेल असे ही त्यांनी नमूद केले. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government should help urgently to flood victims says Udayanraje