शेतकरी वाचविण्यास सरकारने तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

बादल सर्जे
Wednesday, 21 October 2020

यम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने पिकांसोबत जनावरेही मृत्यूमुखी पडलीत. शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणारे नाही. आर्थिक मदतीची गरज आहे. शेतकरी वाचवण्यासाठी तिजोरी उघडी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

जत (जि. सांगली) : कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्‍यात अतिवृष्टी झाल्याने पिकांसोबत जनावरेही मृत्यूमुखी पडलीत. शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणारे नाही. आर्थिक मदतीची गरज आहे. शेतकरी वाचवण्यासाठी तिजोरी उघडी करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी शेट्टी यांनी केली. अचकनहळ्ळी येथे विनायक शिंदे यांची बैल जोडी पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले. 

जिल्हाध्यक्ष महेश खराडे, तुकाराम बाबा महाराज, रमेश माळी, आबा गावडे, पिंटू मोरे, शहाजी साळे, सुधीर माळी, भैरव माळी, शिवाजी पाटील, दामाजी दुबळ, सूरज पाटील, महेश जगताप, निखिल कारंडे, मारुती देवकर, सुरेश पाचिब्रे आदी व शेतकरी उपस्थित होते. 

श्री. शेट्टी म्हणाले,""अवकाळीने शेतीचे नुकसान झाले. पशुधन व मनुष्यहानीही झाली. कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आला. पुन्हा अवकाळीने कंबरडे मोडले. त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्याने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, पंचनाम्याचा बागुलबुवा न करता सर सकट हेक्‍टरी तातडीने 25 हजार मदत द्यावी. सध्या केंद्र मदत देताना पक्षपातीपणा करीत आहे.

राष्ट्रीय आपत्ती निधीतून त्यांची सत्ता ज्या राज्यात आहे त्यांना तातडीने निधी दिला जातो. अन्य राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते. शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. तर रस्त्यावर उतरावे लागेल.''  

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government should open treasury to save farmers: Raju Shetty