पंचगंगा प्रदुषण मुक्तीसाठी शासनाने पावले उचालावी

पंडित कोंडेकर
शुक्रवार, 8 जून 2018

इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदुषण मुक्तीसाठी शासनाने  ५०० कोटीची तरतूद करावी, या सह अन्य मागण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करा, असा नारा देत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन दिले. 

सध्या पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.  विविध राजकीय पक्ष आणि संघटना यांनी या प्रश्नावर रान उठविले आहे. आता शहरातील सर्व कामगार संघटनांची कृती समिती या आंदोलनात उतरली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज प्रांत कार्यालयासमोर  दिवसभर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी विविध घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.

पंचगंगा नदी प्रदुषण मुक्त झालीच पाहिजे, प्रदुषण करणारे घटकांवर कारवाई करावी, पंचगंगा निधीसाठी आलेल्या निधीची चौकशी करावी, पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसाठी  ५०० कोटीचा निधी मिळाला पाहीजे, अशा घोषणा करण्यात आल्या.
आंदोलनाला समाजातील  विविध घटकांनी पाठिंबा दिला. 

आंदोलनात मिश्रीलाल जाजू, आनंदा गुरव, सुनिल बारवाडे, परशराम आगम, राजेंद्र निकम, बंडोपंत सातपूते, पार्वती जाधव, राहूल दवडते, बळीराम नारे, सुभाष कांबळे, बलवंत  दुर्गुळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Government should take steps for the release of Panchaganga pollution