सरकार पानसरे यांच्या मारेकऱ्यांच्या पाठीशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सांगली - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी फडणवीस सरकार चोरीछुपे कृती करीत आहे, असा आरोप आज विविध पुरोगामी पक्ष-संघटनांचे नेते, कार्यकर्त्यांनी केला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनजागृतीसाठी आज सकाळी शहरातून फेरी काढण्यात आली. 

दोन वर्षांपूर्वी सकाळी पत्नीसह मॉर्निंग वॉकला गेलेल्या पानसरेंची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक झाली आहे. सारंग अकोलकर आणि विजय पवार यांना फरार घोषित करण्यात आले आहे. शासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. त्याचा निषेध म्हणून आज फेरी काढण्यात आली.

वीज कामगारांचे नेते रमेश सहस्त्रबुद्धे, ॲड. के. डी. शिंदे, महेश जोतराव, आयुब शेख, इब्राहिम पेंढारी आदींसह नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. सकाळी साडेसात वाजता फेरी सुरू झाली. स्टेशन चौकात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने झाली. प्रमुख मार्गांवरून निघालेल्या फेरीची सांगता पक्ष कार्यालयाजवळ झाली. 

श्री. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘सरकार आरोपींना फरार घोषित करते; मात्र त्यांच्या मालमत्तांवर टाच आणत नाही की, त्याची नोटीस काढत नाही. न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही सरकारचा ढोंगीपणा सुरू आहे. खुन्यांची पाठराखण करणाऱ्या सनातन संस्थेबाबत सरकारलाच प्रेम आहे, असे वाटते. त्यामुळे त्यांच्याकडून तपासाची आशा मावळली आहे.’

Web Title: Government support Pansare's assassination