सरकार आम्ही कशाला पाडू, ते आपोआपच पडेल...दादांचं भाकीत 

The government will fall ... Dad's predictions
The government will fall ... Dad's predictions

शिर्डीः भीमा कोरेगाव प्रकरणासाचा तपास करण्यावरून त्यांच्यातील मतभेद पुढे आलेच आहेत. तथापि शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. मागील सरकारमध्ये ते सहभागी असताना त्यावेळी घेतलेल्या अनेक चांगल्या निर्णयांना ब्रेक लावण्याचे काम ते करीत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. 

काल (रविवारी) सकाळी त्यांनी येथे येऊन साईदर्शन घेतले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, डॉ.राजेंद्र पिपाडा व गजानन शेर्वेकर आदींनी त्यांचे स्वागत केले.अंतर्गत विरोधाने ग्रासलेले तीन राजकीय पक्षांचे सरकार आपोआप पडेल. ते पाडण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही, असेही चंद्रकांतदादा म्हणाले. 

पवारांची शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक 
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच्या विरोधात निर्णय घ्यायला भाग पाडीत आहेत. मागील फडणीस सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयात शिवसेनेचा संबंधच नव्हता. असे कसे म्हणता येईल. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे नक्की स्थान काय आहे, हे समजत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सरकार चालवित आहे. मतांच्या राजकारणासाठी देशात, विरोधक एका विशिष्ट समाजाला रस्त्यावर उतरवीत आहेत. 

आमच्यावर टीका केलेली चालते.. 
शिवसेना दुटप्पी भुमिका घेते. आम्ही त्यांच्यावर टीका केली की त्यांना सहन होत नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी शिवसेनेवर टीका केली की शिवसेनेचे नेते विचारतात, हाच का भाजपचा सुसंस्कृतपणा? आणि सामना या त्यांच्या मुखपत्रातून मात्र ते स्वैर टीका करतात. हा दुटप्पीपणा आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे पार पाडीत आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com