मेघा पानसरे यांनी घेतली तपासाची माहिती

मेघा पानसरे यांनी घेतली तपासाची माहिती

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील प्रगतीची माहिती आज पानसरे कुटुंबीयांनी घेतली. मेघा पानसरे यांनी तपास अधिकारी तिरुपती काकडे यांची भेट घेऊन तपासातील संभाव्य प्रगतीविषयी चर्चा केली. एम. एम. कलबुर्गी यांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मेघा पानसरे यांनी ही भेट घेतली.

गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची माहिती वेळोवेळी पानसरे कुटुंबीयांना दिली जाते. याबाबत मेघा पानसरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, तपास व संभाव्य तपासावर चर्चा केली. कर्नाटकमधील ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या कुटुंबीयांनी विचारवंतांच्या हत्यांचा एकत्रित तपास सीबीआयकडे द्यावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. सुनावणीत सर्व तपास यंत्रणांना तपासाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासातील प्रगतीबाबत चर्चा झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com