पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घेण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटी कडून काढून घ्या, अशी मागणी पानसरे कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी उच्च न्यायालयात केली. पण ही मागणी लेखी स्वरुपात करा, अशा सूचना न्यायमूर्तींनी त्यांना दिली. याबाबत वकीलांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार असल्याचे मेघा पानसरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

शिवसेना नगरसेवकाच्या मोटारीतून 33 हजाराची रोकड लंपास 

पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत सुरू आहे. आतापर्यंत तपास यंत्रणेने काही संशयितांना अटक केली. त्यातील दोन संशयितांवरील चार्जफ्रेमबाब पानसरे कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी आज उच्च न्यायालयात होती.

आईवर हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या संशयिताचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न 

यावेळी युक्तीवादात अॅड. नेवगी यांनी तपास अधिकारी बदला आणि तपास एसआयटीकडून काढून घ्या, अशी मागणी केली. मात्र ही मागणी लिखित स्वरुपात द्या, अशी सूचना त्यांना न्यायमूर्तींनी केली. अद्याप वकीलांशी भेट झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत असे मेघा पानसरे यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govind Pansare Murder case follow up