mangalwedha
mangalwedha

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात मंगळवेढ्याचा गौरव

मंगळवेढा - केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानात राज्यातील 27 कचरामुक्त शहरात मंगळवेढा नगरपालिकेचा 15वा क्रमांक आला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचा गौरव दिल्लीत करण्यात आला. कचरा मुक्त शहरांसाठी असलेला ‘थ्री स्टार’ दर्जा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे.

आवासन व शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, नगरसेवक प्रविण खवतोडे, मुख्याधिकारी पलव्वी पाटील भागीरथी नागणे, सोमनाथ माळी आदी उपस्थित होते. 

स्वच्छ सर्व्हेक्षण 2018 अभियानातही चांगले यश मिळविले पाठोपाठचे हे यश पालिका पदाधिकारी प्रशासन, आरोग्य विभाग, सफाई कामगार व नागरिकांना प्रेरणादायी ठरली आहे. ओला व सुका अशा वगीकृत कचऱ्याचे संकलन करीत सुमारे आठहून अधिक घंटागाड्याद्वारे वगीकृत कचरा गोळा करून ओल्या कचऱ्यापासून गांडूळ निर्मिती प्रकल्प राबवला सुक्‍या कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी व्यवस्था केली. 90 टक्‍क्‍यांवर वैयक्तिक शौचालये आणि इतर कुटूंबांना सार्वजनिक शौचालयांना जोडले. पालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांचे हे यश म्हणावे लागेल. नागरिकांना तक्रारीसाठी अॅप व्दारे ऑनलाईन तक्रार सुविधा दिली. शिवाय प्रबोधनासाठी केलेल्या व्हिडीओची केंद्र सरकारकडून दखल घेतली. याशिवाय जागृतीसाठी शहरातील प्रमुख ठिकाणी भिंतीवर स्वच्छताविषयक बोलकी चित्रे रेखाटली आहेत. 

शिवाय संतांची वचने संतांची स्मारकाकडे जाणाऱ्या मार्गाची माहिती रेखाटली त्याचा प्रभाव शहर स्वच्छतेत सकारात्मक बदल झाला. विविध स्पर्धा, व्याख्याने, मेळावे आदी माध्यमातून स्वच्छतेचा जागर शहरात मांडला. शहर स्वच्छ, सुंदर व हिरवेगार होण्यामागे गल्लीबोळातील वृक्षसंपदा महत्वापुर्ण ठरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com