सोलापूर जिल्ह्यात हरभऱ्याच्या पेरणीत वाढ

राजकुमार शहा
रविवार, 2 डिसेंबर 2018

चालू वर्षी अत्यंत कमी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली असुन कमी पाण्यात येणारे पीक म्हणुन सध्या हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आजपर्यंत 1400 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली असुन अद्यापही ती सुरुच आहे. तालुक्यात गंहु, हरभरा, ज्वारी, मका मिळुन केवळ 31 टक्के पेरणी झाली आहे.
 

मोहोळ- चालू वर्षी अत्यंत कमी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची संभ्रमावस्था झाली असुन कमी पाण्यात येणारे पीक म्हणुन सध्या हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. आजपर्यंत 1400 हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली असुन अद्यापही ती सुरुच आहे. तालुक्यात गंहु, हरभरा, ज्वारी, मका मिळुन केवळ 31 टक्के पेरणी झाली आहे.

मोहोळ तालुक्याचे रब्बीचे सरासरी क्षेत्र 64 हजार 860 हेक्टर असुन त्यापैकी 20 हजार 845 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चालू पावसाळ्यात मोहोळ तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडल्याने विहीरी व बोअर च्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे, त्यामुळे उपलब्ध पाणी तरी टिकेल याची शाश्वती नाही. त्यामुळे दुसरे पीक करणे अडचणीचे झाले आहे.

ऊस गाळपास गेल्याने रिकाम्या झालेल्या व इतर जमिनीवर दोन किंवा तीन पाण्यावर येणाऱ्या हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी सुरू आहे. हरभऱ्याचे पिक पदरात पडुन हरभऱ्याच्या पाणाचे उत्तम खत तयार होते. त्यामुळे जमिनीचा पोत कायम राहण्यास मदत होते. कमी पाण्यामुळे गव्हाची पेरणी ही कमी झाली असुन कालवा परिसरात ती वाढणार आहे . चारा पीक म्हणुन सर्रास शेतकऱ्यांनी मका पेरणी व लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे, त्यामुळे चारा टंचाईवर काही प्रमाणात मात झाली आहे.

पिकाचे सरासरी क्षेत्र व पेरणी झालेले क्षेत्र पुढील प्रमाणे
ज्वारी- सरासरी क्षेत्र 54 हजार 900 हेक्टर आणि पेरणी झालेले क्षेत्र 16 हजार 830 हेक्टर 
गहू- सरासरी क्षेत्र 4909 हेक्टर आणि पेरणी झालेले क्षेत्र 1220 हेक्टर 
हरभरा- सरासरी क्षेत्र 1429 हेक्टर आणि पेरणी झालेले क्षेत्र 1400 हेक्टर
मका- सरासरी क्षेत्र 2364 हेक्टर आणि पेरणी झालेले क्षेत्र 2301 हेक्टर 

Web Title: Gram farming increase in Solapur district