ग्रामपंचायत निवडणूक : सांगली जिल्ह्यातील 152 गावांत रणधुमाळी

अजित झळके
Saturday, 12 December 2020

सांगली जिल्ह्यातील 152 गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उठणार आहे. सायंकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्यात लगबग सुरू झाली.

सांगली ः जिल्ह्यातील 152 गावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उठणार आहे. सायंकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्यात लगबग सुरू झाली. कालपर्यंत सुस्तावलेली यंत्रणा खाडकन जागी झाली आणि कामाला लागली. हाती अवघा एक महिना बाकी असल्याने आता या गावांत धुरळा उठणार आहे. 

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. कोरोना संकटामुळे या निवडणुका पुढे गेल्या होत्या. त्यात एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तासगाव तालुक्‍यातील 41, जत तालुक्‍यातील 30, मिरज तालुक्‍यातील 20, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील 11, खानापूर तालुक्‍यातील 13, आटपाडी तालुक्‍यातील 10, कडेगाव तालुक्‍यातील 9, पलूस तालुक्‍यातील 14, शिराळा तालुक्‍यातील 2 तर वाळवा तालुक्‍यातील 2 गावांमध्ये निवडणूक होत आहे. या सर्व गावांमध्ये सध्या प्रशासक राज आहे. येथे आता कोरोनाचे नियम पाळून रणधुमाळी होईल. नवीन वर्षाचे स्वागत तापलेल्या राजकीय आखाड्यांतच होणार, हे स्पष्ट झाल्याने आता गावागावांत तातडीच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुढील महिनाभर वातावरण हाय टेन्शन असणार आहे. 

निवडणुका होणार असलेली गावे तालुकानिहाय अशी 
* तासगाव तालुका ः बोरगाव, ढवळी, आळते, जुळेवाडी, हानोली, कवठेएकंद, निंबळकर, राजापूर, धामणी, शिरगाव, विसापूर, तुरची, येळावी, धोंडेवाडी, गोटेवाडी, धुळगाव, डोर्ली, हातनूर, कौलगे, लोंढे, मांजर्डे, मोराळे, वज्रचौंडी, वडगाव, वाघापूर, यमगरवाडी, पेड, नागावकवठे, नरसेवाडी, पाडळी, विजयनगर, दहीवडी, डोंगरसोनी, गौरगाव, गव्हाण, जरंडी, लोकरवाडी, सावळज, सिद्धेवाडी. 

* जत तालुका ः भिवरगी, धावडवाडी, गुड्डापूर, गुगवाड, मोरबगी, सनवडी, शेगाव, शिंगनहळ्ळी, सोनलगी, उटगी, वळसंग, उंटवाडी, अंकलगी, घोरेश्‍वर, कुडनूर, करेवाडी, कुलाळवाडी, लमाणतांडा, निगडी बुद्रुक, शेड्याळ, तिकोंडी, टोणेवाडी, येळदरी, मेंढेगिरी, लमाणतांडा (डि), जालिहाळ खुर्द, सिद्धनाथ, अंकले, डोर्ली, उमराणी. 
* मिरज तालुका ः कवठेपिरान, डोंगरवाडी, आरग, लिंगनूर, लक्ष्मीवाडी, मल्लेवाडी, चाबूकस्वारवाडी, एरंडोली, कळंबी, कवलापूर, मालगाव, शिपूर, तानंग, विजयनगर, अंकली, ढवळी, इनामधामणी, कर्नाळ, म्हैसाळ, तुंग. 

* कवठेमहांकाळ तालुका ः बनेवाडी, मोघमवाडी, नांगोळे, जांभूळवाडी, तिसंगी, चोरोची, इरळी, म्हैसाळ, निमज, थबडेवाडी, रायवाडी. 
* खानापूर तालुका ः भिकवडी बुद्रुक, मांगरूळ, मेंगानेवाडी, पारे, तांदळगाव, रेणावी, देवेखिंडी, शेडगेवाडी, पोसेवाडी, माहुली, नागेवाडी, भडकेवाडी, खंबाळे (भा). 
* आटपाडी तालुका ः देशमुखवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे, पात्रेवाडी, शेटफळे, तळेवाडी, विठलापूर, बोंबेवाडी, धावडवाडी, घरनिकी. 

* कडेगाव तालुका ः कोजित, कानारवाडी, ढाणेवाडी, शिरसगाव, शिवणी, यतगाव, रामापूर, अंबक, सोनकिरे, 
* पलूस तालुक्‍यातील ः आंधळी, भिलवडी, भिलवडी स्टेशन, बुरुंगवाडी, दह्यारी, खंडोबाचीवाडी, मोराळे, नागराळे, नागठाणे, रामानंदनगर, सूर्यगाव, तावदरवाडी, तुपारी, माळवाडी. 
* वाळवा तालुका ः भाटवाडी, मसुचीवाडी. 
शिराळा तालुका ः बिळाशी, जांभळेवाडी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election in 152 villages of Sangli district