esakal | सोळा गावांत उमेदवारांची धावपळ :कागदपत्रांसाठी होतेय दमछाक 
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election candidate atmosphere sangli

गावगाड्याचा मुखीया होण्याचा बहुमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे. 

सोळा गावांत उमेदवारांची धावपळ :कागदपत्रांसाठी होतेय दमछाक 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोरंगाव (सांगली) : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कालावधी कमी राहिल्याने उमेदवारी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विसापूर (ता. तासगाव) मंडलातील धावपळ सुरू आहे. पॅनेल प्रमुखांची दमछाक होत आहे. गावावर राजकीय पकड मजबूत राहावी म्हणून राजकीय पक्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे लक्ष देतात. विसापूर मंडलात काही ग्रामपंचायती मोठ्या आहेत. तिथे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षाची चढाओढ सुरु आहे. 

विसापूर मंडलात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा उडू लागला आहे. ही रणधुमाळी महिनाभर सुरू असल्याने कडाक्‍याच्या थंडीतही राजकीय तापमान कमालीचे वाढले आहे. सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम जोराने वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे. गावगाड्याचा मुखीया होण्याचा बहुमान मिळावा म्हणून स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली जात आहे. 

हेही वाचा- गोव्यात हाऊसफुल्लची पाटी : थर्टीफस्टसाठी पर्यटक कोकणात, डिस्टन्सिंगचा फज्जा -

विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कलगीतुरा रंगू लागला आहे. गावागावांत गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. गावकारभारी निवडणुकीच्या कामात मश्‍गुल झालेले पहावयास मिळत आहेत. 
सरपंचपदाचे आरक्षण नंतर होणार असल्याने पॅनेल प्रमुखांना अंदाज लागत नसल्याने निवडणूक खर्चावर नियंत्रण असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा म्हणावा तसा उत्साह दिसत नाही. काही हौशी जे होईल ते होईल या विचाराने निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.  

संपादन- अर्चना बनगे