ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची होतेय उपासमार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

सोलापूर - जिल्ह्यात तीन हजार ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी एक हजार 726 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार मागील पाच ते 10 महिन्यांपासून दिलाच नाही. पगार नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.

जिल्ह्यात एक हजार 27 ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये जवळपास तीन हजार कर्मचारी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. मात्र, ग्रामपंचायतींनी पगार न दिल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी खायचे तरी काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी हे गावातील पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा यांसारखी लोकोपयोगी कामे करतात. या कर्मचाऱ्यांना पाच हजार 100 ते सात हजार 100 याप्रमाणे वेतन देणे बंधनकारक असतानाही अनेक ग्रामपंचायती नियमांप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन देत नाहीत. 2007 पासूनचा राहणीमान भत्त्याचा फरक कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतींकडून दिला जात नाही. राहणीमान भत्त्याचा चालू दर दोन हजार 300 रुपये लागू केला आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीने याची अंमलबजावणी केलेली नाही. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनच्या तालुकाध्यक्षांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या प्रश्‍नावर चर्चा करून ग्रामपंचायत विभागाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पगारी नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस सुरेश राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना निवेदन देऊन पगाराचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे. याबाबत श्री. डोंगरे काय निर्णय घेतात, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पगार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय संख्या
मोहोळ- 150, बार्शी- 170, उत्तर सोलापूर- 40, अक्कलकोट- 185, पंढरपूर- 192, करमाळा- 195, माढा- 170, दक्षिण सोलापूर- 158, सांगोला- 164, माळशिरस- 210, मंगळवेढा- 92, एकूण- 1726.

Web Title: gram panchayat employee