ग्रामपंचायतींना 80 टक्के, पं. समिती, जि. प.ना दहा टक्के निधी

गोरख चव्हाण 
Monday, 17 August 2020

ग्रामपंचायतींना 80 टक्के, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी दहा टक्के निधी अशी 16 व्या वित्त आयोगाची वाटणी करण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे स्पष्ट केले.

कवठेमहांकाळ : ग्रामपंचायतींना 80 टक्के, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रत्येकी दहा टक्के निधी अशी 16 व्या वित्त आयोगाची वाटणी करण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे स्पष्ट केले. कवठेमहांकाळ पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध इमारतींच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय पाटील, आमदार सुमन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचायत समितीच्या सभागृहात माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. 
श्री. मुश्रिफ म्हणाले,""आघाडीच्या काळातील लोक कल्याणकारी योजना मागच्या सरकारने बंद केल्या. महाविकास आघाडीने विकास कामांसाठी निधीचे वाटप केले आहे. 16 वा वित्त आयोग ग्रा. पं. 80, जि. प. व पं. स. यांना प्रत्येकी 10 टक्के निधी असे वाटप केले जाईल, अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

दिवंगत आर. आर. आबा पाटील यांनी केलेले काम आम्ही विसरणार नाही. आमदार सुमनताई पाटील यांच्या पाठीशी पक्ष आणि सरकार ठाम राहील. विकासासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही श्री. मुश्रीफ यांनी दिली. सांगलीसह इतर गावांना पुराचा फटका बसू नये. मिरजेपासून सांगोल्यापर्यंतचे सर्व तलाव भरून घेण्यात येणार आहे. म्हैसाळ टेंभू, ताकारी जलसिंचन योजना सुरू करण्यात येतील आणि शहरातील जनतेला दिलासा मिळेल. दुष्काळी भागातील तालुक्‍यांना उपयोग होईल. असे मंत्री पाटील म्हणाले. 

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही बाब चिंतेची बाब आहे. लोकांनी नेहमी मास्क वापरावा. संसर्गापासून दूर रहावे. उपचारासाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. कोरोनाचे संकट दक्ष राहून परतवून लावावे, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. कोरोनाला भिऊ नका, संसर्ग टाळा आणि उपचार करा, असा संदेश श्री. मुश्रीफ यांनी दिला. 

कोरोनाची लक्षणे असल्यास त्या व्यक्तीने डॉक्‍टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. कुटुंब वाचवावे, असे आवान खासदार संजय पाटील यांनी केले. विकासकामांबाबत सभापती विकास हाक्क यांनी केलेल्या मागण्या राज्य आणि केंद्राकडे मान्य करण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. 
सभापती विकास हक्के यांनी म्हैसाळ व टेंभू योजनेकडे तलाव वर्ग करावेत. पाणीपट्टी वसुली आणि सर्वांना समान पद्धतीने पाणी देणे सोयीचे होईल. तालुक्‍यात आठ कोटीची विकासकामे झाली आहेत, असे स्पष्ट केले.

तहसीलदार बी. जे. गोरे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, गटविकास अधिकारी रवींद्र कणसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश गडदे यांचा सत्कार करण्यात आला. अविनाश पाटील, रोहित पाटील, प्राजक्ता कोरे, अनिता सगरे, चंद्रकांत हाक्के गणपती सगरे, दादासाहेब कोळेकर, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब शिंदे, अविराजे शिंदे, निलम पवार, सुरेखा कोळेकर, मदन पाटील, दीपक ओलेकर, जनार्दन पाटील, हायुम सावनुरकर, दत्ताजीराव पाटील, चंद्रशेखर सगरे, दिलीप पाटील, भानुदास पाटील, आयाज मुल्ला, दीपक गुजले, राजेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. टी. व्ही. पाटील यांनी आभार मानले. 

 
संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayats get 80 percent fund