ग्रामसेवकांचे धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सांगली - ग्रामसेवकांच्या विविध प्रश्‍नांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. राज्य शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी असहकार आंदोलन मोहीम सुरू आहे. त्याचा दुसऱ्या टप्प्यात ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केले. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 17 पासून बेमुदत कामंबदचा इशारा देण्यात आला आहे.

असहकार आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्णपणे ठप्प होते. ग्रामसेवकांवरील अन्याय, मारहाण, खोट्या केसीस याबाबत झेडपी प्रशालनाने तातडीने संबंधित दोषीवर कारवाई करून न्याय द्यावा, कंत्राटी ग्रामसेवकांचा तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्यांना तातडीने नियमित करावे, प्रवास भत्ता वेतनाबरोबर मिळावा, ग्रामसेवकांची शैक्षणिक आर्हता पदवीधर करावी, सन 2011 च्या लोकसंख्या गणनेवर पदे निर्माण करावीत, ग्रामसभांची संख्या मर्यादित करावी, महाराष्ट्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, राज्यस्तरीय पुरस्कार द्यावेत, वीस ग्रामपंचायतींसाठी एक विस्तार अधिकारी नेमावा, 2005 नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सुधारित जॉब चार्ट तयार करावा, राज्यभरात ग्रामसेवकांवरील हल्ले, मारहाण, खोट्या केसीस होतात. दोषींना जामीन न देण्याचा निर्णय घ्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव, एम, एन. पाटील, संपतराव माळी, संग्राम सुतार, व्ही. एस. गुरव, रोहिदास कोळी, संभाजी माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

Web Title: gram sevak hold protest