मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी 28 तारखेला मतदान

राजकुमार शहा
बुधवार, 16 मे 2018

मोहोळ तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुक प्रक्रियेतील एकुण 25 जागेसाठी 36 जण निवडणुकीच्या रिंगणात होते.  त्यापैकी 16 जागा बिनविरोध झाल्या आहेत. बोपले शिंगोली तरटगाव व यावली या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्जच प्राप्त झाले नसल्याने त्या ठिकाणच्या जागा रिक्त आहेत.

मोहोळ (सोलापूर) - मोहोळ तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुक प्रक्रियेतील एकुण 25 जागेसाठी 36 जण निवडणुकीच्या रिंगणात होते.  त्यापैकी 16 जागा बिनविरोध झाल्या आहेत. बोपले शिंगोली तरटगाव व यावली या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्जच प्राप्त झाले नसल्याने त्या ठिकाणच्या जागा रिक्त आहेत.

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडनुकीसाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अनेक राजकीय कुरघोडया व डावपेचानंतर अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडली. यामध्ये कृष्णा बाबुराव गुंड(अनगर), सुबाबाई बाळु राठोड (दादपुर), समाधान ज्ञानोबा जावळे(शिरापूर), साधना रामेश्वर चव्हाण (शिरापूर), पुजा पांडुरंग अधटराव (शिरापूर), मधुकर बाबु लोखंडे (डिकसळ), विजय दतात्रय मोटे (नरखेड), सुंदर अशोक पाटील, समीर अल्लाउद्वीन शेख, गजेंद्र शंकर वाघमारे, लक्ष्मी विजयकुमार कोरे, पुनम विष्णु फाळके, रमेश बलभीम चंदनशिवे, छाया अभिमान सोनवणे, शेखर पांडुरंग चोरमुले, चांदणी बाबासाहेब गावडे (सर्व जण वाघोलीवाडी) हे बिनविरोध निवडून आलेले ऊमेदवार आहेत. आता उर्वरिेत जागांसाठी येत्या 28 तारखेस मतदान होणार आहे.

Web Title: grampanchayat election in mohol taluka