शिराळ्यात 27 गावांत धुमशान; नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

शिवाजीराव चौगुले
गुरुवार, 12 एप्रिल 2018

ग्रामपंचायती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी आपली राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे.

शिराळा - तालुक्‍यात दुसऱ्या टप्प्यात 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. जास्ती जास्त ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या कशा करता येतील यासाठी नेत्यांनी आपली राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. शिराळा तालुक्‍यात 92 ग्रामपंचायती होत्या. पैकी शिराळा येथे नगरपंचायत झाली.

91 ग्रामपंचायती उरल्या आहेत. 61 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात झाल्या. आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांनी सोईनुसार एकमेकांशी आघाड्या केल्या. काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढून ग्रामपंचायती त्याब्यात घेतल्या. 'आम्हीच नंबर वन' असा दावा शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांनी केला. तर आघाडीचे वर्चस्व असल्याचा दावा मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी केला. आत्ता पहिल्या टप्प्यात राहिलेली कसर दुसऱ्या टप्प्यात भरून काढण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनीही प्रभागनिहाय चाचपणी सुरु केली आहे.  

या गावात टशन आंबेवाडी, अस्वलेवाडी, बेलेवाडी, भाटशिरगाव, चिखलवाडी, धसवाडी, इंगरुळ, करुंगली, खराळे, खुजगाव, कुसाईवाडी, कुसळेवाडी, मादळगाव, मानेवाडी, मराठेवाडी, चिंचेवाडी, मेणी, मोरेवाडी, पाचगणी, पणुंब्रे तर्फ वारुण, फकिरवाडी, रांजणवाडी, रिळे, सावंतवाडी, शिरसटवाडी, शिरशी, वाकुर्डे बुद्रुक. मतदार याद्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काही हरकती व सूचना असतील तर त्या 18 ते 23 एप्रिलपर्यंत निवडणूक शाखेत सादर कराव्यात. मतदार यादी जाहीर करून अंतीम प्रसिद्ध 25 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: grampanchayat elections in shirala village