ग्रामपंचायत हद्दीमधील दारू दुकाने सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

सातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गानजीकच्या दारू दुकानांच्या नूतनीकरणाबाबत शासनाने नियमांमध्ये बदल केल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीमधील शंभर दारू दुकाने उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महामार्गावर अपघातांवर नियंत्रण आणण्याचा एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतराच्या आत असलेली दारू दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्याचा जिल्ह्यातील सुमारे ५०० दुकानांना फटका बसला होता. त्यामुळे दारू दुकानदारांचे धाबे दणाणले होते. त्यानंतरच्या काळात पूर्वीच्या आदेशात बदल होऊन महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमधील दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय आला. त्यामुळे शहरी भागातील दुकानदार सुखावले गेले.

मात्र, ग्रामीण भागातील महामार्गावरील दुकानांबाबत काही निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे एक वर्षापासून ही दुकाने बंद होती.

या दुकानांच्या नूतनीकरणाबाबत शासनाने नुकतेच नियम तयार केले आहेत. त्यानुसार सुमारे शंभर दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत.

Web Title: grampanchyat area liquor shop