नेवासे तालुक्यात क्रांतीकारी शेतकरी पक्षाचेच वर्चस्व

Grampanchyat Election Result
Grampanchyat Election Result

नेवासे - नेवासे तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या सरपंचांसह सदस्य पदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडे १०, भाजपच्या आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाउपाध्यक्ष सचिन देसर्डा व शेवहाव-पाथरडी विधानसभा मतदार संघाचे प्रभारी दिनकर गर्जे यांच्या गटाकडे प्रत्येकी एक असे भाजपाकडे ३, माजी खासदार तुकाराम गडाख गटाला एक तर सौंदाळे येथे स्थानिक सर्वपक्षीय तर जैनपूर येथे भाजप वगळून सर्वपक्षीय आघाडीची सत्ता ग्रामपंचायतमध्ये आली आहे. दरम्यान भाजपने (मुरकुटे गट) सात ग्रामपंचायतीवर आपले दावे केले पैकी सहा नवनिर्वाचित सरपंचांनी आपण स्वतंत्र असल्याची भूमिका 'सकाळ'कडे जाहीर केल्याने सध्यातरी मुरकुटे गटाकडे जायगुडे आखाडा हि एकमेव ग्रामपंचायत ताब्यात असल्याचे चित्र आहे. दरम्यान विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळन करत विजयी मिरवणूका काढुन आनंद व्यक्त केला. 

    नेवासे तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये तहसीलदार सुधीर पाटील, नायब  तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, नारायण कोरडे. निवडणूक शाखेचे भाऊसाहेब मंडलिक यांच्या नियोजनाखाली गुरुवार (ता. २७) रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडून आलेले सरपंच, सदस्य व बिनविरोध सदस्य व गावे पुढील -

बेलपांढरी - साहेबराव विठ्ठल गारुळे (सरपंच), सदस्य : उषा गारुळे, शोभा बाळासाहेब गारुळे, नामदेव गारुळे, सिंधु गारुळे, गंगाधर सोनवणे, विठ्ठल ताके, ज्योती खरचंद.

गिडेगाव - अनिता भगवान कर्डीले (सरपंच), सदस्य : सविता माळी, सीमा गायकवाड, वर्षा काळे, किशोर लक्ष्मण ताकवले, भगवान साळुंके, पुष्पा कर्डीले, दादासाहेब कर्डीले, शीतल गायकवाड, उज्वला कर्डीले. 

गोमळवाडी - संगिता सुदाम आरसुळे (सरपंच), सदस्य : बाळासाहेब गाडेकर, जिजाबाई जाधव, मारुती माळी, कविता डोईफोडे, कमल आरसुळे, गणेश गर्जे. बिनविरोध : वंदना ठुबे. 

घोडेगाव - राजेंद्र दगडूराम देसर्डा (सरपंच), सदस्य ; यशवंत येळवंडे, मच्छीन्द्र कदम, जनाबाई टेमकर, निसार सय्यद, निर्मला वैरागर, किरण ब-हाटे, वैशाली काळे, संगिता येळवंडे, राजू पाटोळे, हर्षदा सोनवणे, सुनीता येळवंडे, रमेश जाधव, पारस चोरडिया, अस्मिन शेख, वसंत सोनवणे, सविता आल्हाट. बिनविरोध : लक्ष्मी विष्णू गि-हे.

जैनपूर - सुरेश केशव डीके (सरपंच), सदस्य : विनायक डीके, सविता वाघ, शारदा तागड, भारत बर्डे, भाऊपाटील घुगे, पार्वता शिरसाठ, हरीचंद्र डिके, सुरेखा शिंदे, शिला डिके. 

जायगुडे आखाडा - इंदूबाई मच्छीन्द्र डौले (सरपंच), सदस्य : सुवर्णा मोरे, दुर्योधन चंद, कडूबाई गायकवाड, किसन कोतकर, वृषाली चव्हाण, मनीषा भाकरे, राजेंद्र पेचे, सुभाबाई हिरगळ, ललिता ससे.

खामगाव - केदारनाथ बाबासाहेब आगळे (सरपंच), सदस्य : राजेंद्र चरभरे,वैशाली आगळे,  शरद कु-हाडे, रामेश्वर राव, मुक्ताबाई सोलट, नंदा आगळे, दादाराम आघम, नंदा आघम, देविदास राव, शीतल आगळे, उज्वला जाधव.  

खेडले काजळी - बाळासाहेब येडू कोरडे (सरपंच), सदस्य : हरिभाऊ कोरडे. बिनविरोध : दिनकर उदे, शीतल एकबोटे, सविता ढगे, जगन्नाथ पवार, मनिषा शिरसाठ, चंद्रकला हाडूळे.

लोहारवाडी - पोपट काशीनाथ माळी (सरपंच), सदस्य : अलका माळी, सुनीता फुंदे, गोविंद केकाण, मिरा फुंदे, बापूसाहेब बोरुडे, सतीश बुळे, सरुबाई फुंदे. 

नांदूरशिकारी - केशरबाई सरोदे (सरपंच) सदस्य : मंगल टीमकरे नंदाबाई लीपणे, रोहिणी कर्डीले, संतोष लिपणे, संदीप लिपणे. बिनविरोध : आप्पासाहेब पवार,जिजाबाई शिरसाठ. 

पानसवाडी - लक्ष्मी तुकाराम गडाख (सरपंच), सदस्य : संजय जाधव, कल्पना गडाख, विजया शिंदे, निलेश बानकर, सविता बानकर, अनिता शिंदे, दत्तात्रय जाधव, रविंद्र सोनवणे, अर्चना वैरागर.

राजेगाव - अंबादास निवृत्ती आव्हाड (सरपंच), सदस्य : मुक्ताबाई आव्हाड, बलभीम कराळे, लता घुले. बिनविरोध : रामनाथ आव्हाड, पांडुरंग आव्हाड,मंदाबाई आव्हाड, आशाराव मांडवकर. 

सौंदाळे - प्रियंका शरद आरगडे (सरपंच), सदस्य : कानिफनाथ आरगडे, जगन्नाथ आढागळे, सविता आरगडे, रामकीसन सामुटे, रुख्मिणी आरगडे, सचिन आरगडे, सुरेखा बोधक, उषा आरगडे. बिनविरोध : लता आरगडे. 

वडूले - दिनकर भानुदास गर्जे (सरपंच), सदस्य : कस्तुरी हळनोर, लता गर्जे, कडुबाई सरोदे, सुनीता खाटीक, अनिता सरोदे, लता आतकरे, अर्चना देवढे. 

वंजारवाडी - सुनंदा महादेव दराडे (सरपंच), सदस्य : कैलास डोळे, सुनंदा डोळे, नंदिनी सांगळे, बाळासाहेब कराडे, कमलेश पालवे, उर्मिला दराडे, रामजी वैरागर, सुशीला एडके, जया माळी. 

झापवाडी - सोमनाथ धोंडीराम कदम (सरपंच), सदस्य : पांडुरंग वाघ, संगिता झरेकर, सारिका जरे. बिनविरोध : बाबासाहेब जरे, तुकाराम जरे, रुपाली वाघ, भाऊराव साळवे, लता काळे, गंगुबाई वाघ.

पाथरवाला - येथील ग्रामपंचायतीची सरपंच व सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.   

    दरम्यान मतमोजणी व तालुक्यात विविध ठिकाणी पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, सोनईचे सहायक पोलीस कैलास देशमाने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

ईश्वरीचिठ्ठीवर सरपंच व सदस्यांचे भाग्य
तालुक्यात गोमाळवाडी येथे सरपंच पदासाठी संगीता सुदाम आरसुळे व कमल गोरक्षनाथ आरसुळे यांच्यात लढत झाली दरम्यान या दोनही उमेदवारांना 337-337 असे समान मते पडली तर नांदूरशिकारी येथील सदस्यापदासाठी संभाजी म्हसरूप व संदीप लिपाणे या दोन उमेदवारांना 71-71 असे समान मते पडल्याने त्यांच्यात शासनाच्या प्रचलित नियमानुसार लहानमुलाकडून ईश्वरीचिठ्ठी काढण्यात आली त्यात सरपंचपदासाठी संगीता आरसुळे यांचीतर सदस्यासाठी संदीप लिपणे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com